चांदूर बाजारमध्ये मध्यरात्री पोलिसांचा सापळा ; एमडी ड्रग्ससह तिघे जेरबंद
चांदूर बाजारमध्ये मध्यरात्री पोलिसांचा सापळा ; एमडी ड्रग्ससह तिघे जेरबंद
अमरावती ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत चांदूर बाजार परिसरातून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ससह तीन आरोपींना ताब्यात घेतले. विशेष कोंबिंग ऑपरेशनदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.
पहाटेच्या सुमारास खरवाडी फाटा परिसरात पोलिसांनी सापळा रचून पल्सर मोटारसायकलवरून येणाऱ्या तिघांना अडवले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून ७.१९० ग्रॅम एमडी ड्रग्स, मोटारसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आले.
अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशान्वये सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली असून आरोपींवर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“ड्रग्स विक्रेत्यांवर पोलिसांचा करडा पहारा कायम राहणार,” असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0