राजेंद्र कॉलनी–विजय कॉलनी परिसरात युवकाची निर्घृण हत्या; चाकू हल्ल्याने खळबळ
राजेंद्र कॉलनी–विजय कॉलनी परिसरात युवकाची निर्घृण हत्या; चाकू हल्ल्याने खळबळ
अमरावती
अमरावती शहरातील राजेंद्र कॉलनी–विजय कॉलनी, नारायण नगर परिसरात सोमवारी सकाळी एका युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात ताज नगर येथील शेख आफाक शेख शकील (रा. ताज नगर) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पोहवाळ सिमेंट डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेल्या अवस्थेत युवक आढळून आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने इर्विन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासात हल्लेखोरांनी शेख आफाक यांच्या गळ्यावर व छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून हत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकेही कार्यरत करण्यात आली आहेत.
या धक्कादायक घटनेमुळे राजेंद्र कॉलनी, विजय कॉलनी आणि ताज नगर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0