चांदूर रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई;

May 6, 2026 - 16:57
 0  0
चांदूर रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई;

चांदूर रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई; जुगार व वरळी मटका अड्ड्यांवर छापे, ४.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त
चांदूर रेल्वे (जि. अमरावती) | दि. ५ मे २०२६
चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जुगार व वरळी मटका व्यवसायावर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण ₹4,05,850/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.वडगाव राजदि येथे जुगार अड्ड्यावर छापा
गुप्त माहितीच्या आधारे स्मशानभूमीमागील शेतात सुरू असलेल्या ‘एक्का बादशाह पत्ती’ जुगारावर पोलिसांनी रेड केली. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तीन आरोपी फरार झाले आहेत.
आरोपींकडून ₹3,610/- रोख रक्कम, 52 ताशपत्ते, मोबाईल फोन आणि सहा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. संबंधित आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात वरळी मटका अड्ड्यांवर कारवाई
चांदूर रेल्वे शहरातील बसस्टॉप परिसरात आणि बासलापूर गावात सुरू असलेल्या वरळी मटका अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकले. या दोन कारवाईत ₹5,240/- रोख रक्कम व मटका साहित्य जप्त करण्यात आले.
 वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार आणि पोलीस निरीक्षक अजय आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिसांच्या पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत अवैध धंद्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला.
सदर प्रकरणाचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0