गौरखेड्यात अवैध हातभट्टी उद्ध्वस्त; 84 हजार लिटर मोहसडवा नष्ट
गौरखेड्यात अवैध हातभट्टी उद्ध्वस्त; 84 हजार लिटर मोहसडवा नष्ट
चांदूर रेल्वे, 31 मे – अवैध गावठी दारू निर्मितीविरोधात चांदूर रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत गौरखेडा येथील पारधी बेड्यावर सुरू असलेली हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत सुमारे 9.88 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त व नष्ट करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात दारू निर्मितीसाठी वापरला जाणारा मोहाचा सडवा, नवसागर, गूळ आणि इतर साहित्य आढळून आले.
कारवाईत 84 हजार लिटर मोहाचा सडवा नष्ट करण्यात आला. तसेच दारू निर्मितीसाठी वापरली जाणारी विविध उपकरणे व साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुख्य आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदूर रेल्वे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0