आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दणक्यामुळे पोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्र सुरू
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दणक्यामुळे पोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्र सुरू
आ.मुनगंटीवार यांच्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; हमीभावाने मक्याची खरेदी सुरू
मका खरेदीतील दिरंगाईवर आ. मुनगंटीवार यांचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडे केलेला पाठपुरावा ठरला निर्णायक
चंद्रपूर : मका उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दणक्यामुळे अखेर पोंभूर्णा येथील मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. हमीभावाने मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे,आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानीपासून दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि ठाम पाठपुराव्यानंतर पोंभूर्णा येथील केंद्र सुरू झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मका लागवड झाली असून उत्पादनही चांगले झाले आहे. मात्र शासनाची हमीभाव खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपला मका कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली होती. बाजारात मक्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून साठवणुकीचा प्रश्नही गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न अत्यंत आक्रमकपणे शासनाकडे मांडत प्रशासनाला तातडीने निर्णय घेण्यास भाग पाडले.
आ. मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रात खरेदी प्रक्रियेत झालेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मिळालेच पाहिजे आणि त्यांना हमीभावाचा प्रत्यक्ष लाभ मिळाला पाहिजे, ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली होती. त्यांच्या या आक्रमक पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हालचाल करत पोंभूर्णा येथील मका खरेदी केंद्र सुरू केले.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण आणि परिणामकारक भूमिका घेणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीही धान, कापूस, सिंचन आणि कृषीविषयक अनेक प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधून त्यातून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पोंभूर्णा येथील मका खरेदी केंद्र सुरू होणे हे देखील त्यांच्या प्रभावी पाठपुराव्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे. पोंभूर्णा परिसरातील शेतकऱ्यांनी याबद्दल समाधान व्यक्त करत आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. खरेदी केंद्र सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांना हमीभावाने मका विक्रीची सुविधा उपलब्ध होणार असून आर्थिक दिलासा मिळणार आहे.
आज पोंभूर्णा येथे मका खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या सरचिटणीस अल्काताई आत्राम, तालुकाध्यक्ष हरीश ढवस, सुलभाताई पिपरे, बाजार समितीचे सभापती रवींद्र मरपेल्लीवार, विनोद देशमुख, ऋषी कोटरंगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी बांधव, बाजार समितीचे सर्व संचालक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0