घरफोडी प्रकरणाचा छडा; राजापेठ पोलिसांकडून चार आरोपी अटकेत
: घरफोडी प्रकरणाचा छडा; राजापेठ पोलिसांकडून चार आरोपी अटकेत
अमरावती शहरातील राजापेठ पोलीसांनी घरफोडीच्या प्रकरणात तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे.
फिर्यादी शैलेश जनार्दन जोग यांच्या घरातून अॅमरॉन बॅटरी, इलेक्ट्रिक वायर, लोखंडी पाईप यासह विविध साहित्य चोरीला गेले होते. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नसीन भोसले, सुशीला भोसले, संकीता भोसले आणि मुलचंद पवार यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमालासह इतर ठिकाणांहून चोरलेला मालही जप्त केला.
एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींनी आणखी काही गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीसांच्या पथकाने केली.
[2:56 pm, 23/05/2026] Prashant Nager: ......
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0