अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू तस्करीविरोधात मोठी आणि धडक कारवाई

May 13, 2026 - 15:50
 0  0
अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू तस्करीविरोधात मोठी आणि धडक कारवाई

अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू तस्करीविरोधात मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल २५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चिखलदरा परिसरात मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात होणारी विदेशी दारूची तस्करी उधळून लावत पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर घटांग मार्गावर सापळा रचण्यात आला.
संशयित तीन चारचाकी वाहनांची तपासणी केली असता टोयोटा कारमधून “ऑफिसर चॉईस” कंपनीच्या विदेशी दारूच्या तब्बल ४५ पेट्या आढळून आल्या.

या कारवाईत तीन चारचाकी वाहने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण २५ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तसेच पायलटिंग करणारी वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिखलदरा पोलीस करत आहेत.

पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात ही मोठी कारवाई पार पडली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0