अमरावतीत हातभट्टी दारूवर कारवाई — दोन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल
अमरावतीत हातभट्टी दारूवर कारवाई — दोन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल
अमरावती (दि. 05 मे 2026) – फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत हातभट्टी दारू निर्मिती व विक्री प्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या कारवाईत आरोपी नंदा देविदास भरद्वाज (वय 50, रा. परिहारपुरा, वडाळी) या त्यांच्या राहत्या घरासमोरील आवारात हातभट्टी दारू तयार करताना आढळून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 100 लिटर हातभट्टी दारू व 200 लिटर मोहाचा सडवा जप्त केला. तसेच संबंधित साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. या कारवाईत अंदाजे ₹75,750 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत कमलाबाई वामनराव चाचरकार (वय 60, रा. भुईपुरा, वडाळी) या हातभट्टी दारू विक्री करताना आढळल्या. त्यांच्याकडून 20 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून अंदाजे ₹6,000 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दोन्ही आरोपींविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(क)(फ)(ड) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0