भारत रशियाकडून तेल खरेदी करणार की नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर रशियाने काय म्हटलं?

Feb 3, 2026 - 20:43
 0  0
भारत रशियाकडून तेल खरेदी करणार की नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर रशियाने काय म्हटलं?

India Russia Trade : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणार आहे अशी माहिती देताना भारतावरील कर कमी करण्याची घोषणा केली आहे. यावर आता रशियाने उत्तर दिले आहे.

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 25 % वरून 18% पर्यंत कमी केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात या मुद्द्यावर एक महत्त्वपूर्ण करार झाला. ट्रम्प म्हणाले की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणार आहे. भारत आगामी काळात अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून इंधन खरेदी करणार आहे. तसेच भारत अमेरिकेकडून जवळपास सर्वच वस्तूंची खरेदी करेल असंही ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावर आता रशियाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणार की नाही?

अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करारावर रशियाने अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली आहे. भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असं ट्रम्प यांनी सांगितले आहे. यावर बोलताना रशियाने म्हटले आहे की भारताना आम्हाला याबाबत माहिती दिलेली नाही. रशियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. यात भारताने तेल खरेदी थांबवण्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबत कोणताही संदेश भारताकडून मिळालेला नाही.

ट्रम्प यांनी व्यापार करारावर काय म्हटले होते?

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. मोदींनी मला सांगितले की आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, त्यानंतर आम्ही शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारतावरील शुल्क 18 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.’ यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा फायदा होणार आहे.

भारत रशियाकडून किती तेल खरेदी करतो?

भारत रशियाकडून इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात जास्त तेल खरेदी करतो. 2024-2025 मध्ये भारताने रशियाकडून अंदाजे 88 दशलक्ष मेट्रिक टन तेल खरेदी केले होते. मात्र डिसेंबर 2025 नंतर ही तेल खरेदी कमी झाली. डिसेंबर 2025 मध्ये भारताने रशियाकडून फक्त 1.38 दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले, जे 2025 च्या उर्वरित महिन्यांपेक्षा 22 टक्के कमी होते. दरम्यान, ट्रम्प यांनी भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र ही खरेदी कधी होईल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0