: पुण्यात “विकसित महाराष्ट्र 2047” शहरी संवाद; महापौर तेजवानी यांचा सत्कार

May 7, 2026 - 13:43
 0  1
: पुण्यात “विकसित महाराष्ट्र 2047” शहरी संवाद; महापौर तेजवानी यांचा सत्कार

: पुण्यात “विकसित महाराष्ट्र 2047” शहरी संवाद; महापौर तेजवानी यांचा सत्कार
यशदा (YASHADA) येथे “विकसित महाराष्ट्र 2047” या संकल्पनेअंतर्गत राज्यस्तरीय शहरी संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातील महापौर, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीचंद तेजवानी (महापौर, अमरावती महानगरपालिका) यांचा सत्कार करण्यात आला.
महापौर तेजवानी यांनी सांगितले की, विकसित महाराष्ट्रासाठी स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम व पारदर्शक असणे आवश्यक आहे. अमरावतीमध्ये डिजिटल गव्हर्नन्स, स्वच्छता, जलसंवर्धन व पायाभूत सुविधांवर काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांचा सहभाग वाढवून प्रशासन अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात डिजिटल प्रशासन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक विकास, जलव्यवस्थापन आणि स्थानिक संस्थांची आर्थिक क्षमता वाढविणे या विषयांवर चर्चा झाली. युवक व महिलांच्या सहभागावरही विशेष भर देण्यात आला.
या संवादातून राज्यातील शहरी विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
[6:59 pm, 06/05/2026] Prashant Nager: .......

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0