शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी अपडेट, नेमकं काय सांगितलं?

Feb 9, 2026 - 16:46
 0  1
शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी अपडेट, नेमकं काय सांगितलं?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे, त्यांना बारामतीमधून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या सोबत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या देखील आहेत.

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे, त्यांना उपचारासाठी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचं बोललं जात होतं, मात्र आज अचानक त्रास वाढल्यामुळे त्यांना बारामतीमधून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाणार आहे.

आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांची तपासणी होणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर काय उपचार करायचे ते ठरवलं जाणार आहे. जर गरज वाटली तर त्यांना रुग्णालयात ॲडमिट करून घेतलं जाईल, परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकदा, सर्दी आणि तापेचा त्रास जाणवत होता, त्यामुळे सकाळीच डॉक्टरांच्या एका पथकाकडून शरद पवार यांची त्यांच्या बारामतीमधील निवासस्थानी तपासणी करण्यात आली होती. मात्र त्रास थोडा वाढल्यानं पुन्हा एकदा डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली, त्यानंतर त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना खोकल्याचा त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. शरद पवार यांची तपासणी करून उपचाराबाबत निर्णय घेतला जाईल, गरज पडली तर त्यांना ॲडमिट करून घेतलं जाईल, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे या देखील सध्या शरद पवार यांच्यासोबतच आहेत. थोड्यात वेळात त्यांच्यावर काय उपचार केले जाणार? याबाबतची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0