अफवांचा बाजार उठला! पेट्रोल, डिझेलसाठी पेट्रोल पंपावर रांगाच रांगा, बाटली, कॅनमधून पेट्रोल देण्यास मनाई; असोसिएशनचं आवाहन काय?

Mar 4, 2026 - 15:58
 0  0
अफवांचा बाजार उठला! पेट्रोल, डिझेलसाठी पेट्रोल पंपावर रांगाच रांगा, बाटली, कॅनमधून पेट्रोल देण्यास मनाई; असोसिएशनचं आवाहन काय?

Petrol-Diese Price: अनेक पेट्रोल पंपावर गाड्यांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. वाढलेली गर्दी पाहून पंप मालकांनी बाटली, कॅनमधून पेट्रोल देण्यास मनाई केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर आज अचानक वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार किंवा पुरवठा बंद होणार अशी अफवा पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर धाव घेतली.

या गर्दीदरम्यान काही ठिकाणी पेट्रोल भरण्यावरून दुचाकीस्वार आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्याची माहिती समोर आली आहे. तर नेहमी शंभर-दोनशे रुपयांचे पेट्रोल भरणारे वाहनधारकही आज सहाशे रुपयांचे पेट्रोल भरत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

जालना संभाजीनगर महामार्गावरील सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाल्यानंतर पंप चालकांनी पेट्रोल टंचाई नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती चालकांना दिली. नागरिकांनी संयम बाळगावा अशी देखील विनंती केली आहे.

रत्नागिरीमध्ये देखील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी झाली आहे. रत्नागिरीतल्या सर्वच पेट्रोल पंपांवरती डिझेल आणि पेट्रोलचा पुरेसा साठा आहे. पेट्रोल 105.45 रुपये लिटर, तर डिझेल 91.97 रुपये लिटर आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोलचे दर स्थिर आहेत. पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा असल्याने वाहन चालकांनी गर्दी करू नये प्रशासनाचे आव्हान केले आहे. परभणीमधील पेट्रोल पंपावरील गर्दी रोडावली जिल्हधिकार्यांच्या आदेशानंतर बाटली, कॅन मध्ये पेट्रोल देणं झालं बंद WKT.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0