पळसाखेड शिवारात बिबट्याची दहशत
अंजनगाव सुरजी/१४ – मौजा पालखेडमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १२ एप्रिलच्या रात्री घडलेल्या या घटनेत, बिबट्याने शेतात शिरून एका वासरावर हल्ला करून त्याला ठार मारले. ही घटना बाबाराव पवार नावाच्या शेतकऱ्यामुळे उघडकीस आली.
बाबाराव पवार यांचे शेत गावातच आहे. रात्रीच्या अंधारात बिबट्या गोठ्यापर्यंत पोहोचला. आत शिरून त्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार मारले. सकाळी शेतात वासराचा मृतदेह दिसल्यावर ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0