पीएमएवाय प्रकल्पांची आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून पाहणी; लाभार्थ्यांशी साधला संवाद
पीएमएवाय प्रकल्पांची आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून पाहणी; लाभार्थ्यांशी साधला संवाद
अमरावती, दि. २७ मे २०२६ : अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत सुरू असलेल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत कामांचा सविस्तर आढावा घेतला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या प्रकल्पांतील कामांच्या गुणवत्तेची तपासणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान नवसारी येथील सर्व्हे नं. १२९/२ मधील प्लॉट क्रमांक १०७ ते ११३ तसेच ९१ ते ९७ येथील प्रत्येकी ४८ सदनिकांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर राहटगाव परिसरातील सर्व्हे नं. १९९/३ मधील ४८ सदनिका, सर्व्हे नं. ११६/२ मधील ३२ सदनिका आणि सर्व्हे नं. १२७/२ मधील ८६ सदनिकांचा आढावा घेण्यात आला.
आयुक्त वर्षा लड्डा यांनी बांधकाम गुणवत्ता, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, स्वच्छता, अंतर्गत रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांची तपासणी केली. काही ठिकाणी प्रलंबित असलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी आयुक्तांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेमुळे स्वतःचे घर मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले.
तसेच विकासकांना बांधकामाची गुणवत्ता अबाधित ठेवत उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रकल्पांतील ड्रेनेज व्यवस्था, परिसर स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधा लवकर सुरू करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपअभियंता शरद तिनखेडे, लक्ष्मण पावडे, नंदकिशोर तिखिले, आशिष अवसरे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर तसेच पीएमएवाय कक्षाचे कर्मचारी आणि विकासक उपस्थित होते.
[12:32 pm, 28/05/2026] Prashant Nager: .......
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0