होळी स्पेशल अनारक्षित मेमू ट्रेन
बडनेरा / २ – होळीनिमित्त देवलाली-नया अमरावती रेल्वे स्थानकावरून विशेष मेमू ट्रेन चालवण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. होळीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी सुविधा देण्यासाठी विशेष मेमू ट्रेन चालवण्याचे रेल्वे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. देवलाली-नया अमरावती विशेष मेमू ट्रेन सहा वेळा धावेल. ट्रेन क्रमांक ०११०३ ही २, ३ आणि ४ मार्च रोजी दुपारी १:३५ वाजता देवलालीहून निघेल आणि सकाळी ९:३० वाजता नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0