Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, लगेच खरेदी करा

Feb 16, 2026 - 15:23
 0  0
Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, लगेच खरेदी करा

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सतत आकाशाला स्पर्श करणारे सोन्याचे भाव आज चांगलेच उतरले आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये सोने हा धातू अतिशय मौल्यवान समजला जातो. त्यामुळे प्रत्येक आनंदाच्या क्षणी सर्वजण सोन्या आणि चांदीचे दागिने घालतात. पण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेला सोन्याचा भाव हा सर्वसमान्यांना न परवडणारा झाला आहे. मात्र, आज सोन्याचा भाव उतरला आहे.

सोने आणि चांदीचे भाव हे गेल्या वर्षापासून सतत वाढत आहेत. हजारो रुपयांना मिळणारे सोने हे आता लाखो रुपयांमध्ये मिळत आहे. आजचा सोन्याचा भाव किती उतरला आहे जाणून घ्या..

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 100 रुपयांची घसरले आहेत. तर चांदीच्या दरात तब्बल दहा हजार रुपयांनी घसरण झाली आहे.

आज सोने आणि चांदीचे भाव हे सर्वसमान्यांच्या खिश्याला परवडणारे आहेत. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 59 हजार 135 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर पोहोचले आहेत.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0