Silver Rate : चांदी तब्बल 20000 रुपयांनी स्वस्त; एका झटक्यात भाव घसरला, आणखी स्वस्त होणार?

Feb 5, 2026 - 17:32
 0  0
Silver Rate : चांदी तब्बल 20000 रुपयांनी स्वस्त; एका झटक्यात भाव घसरला, आणखी स्वस्त होणार?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. आता चांदीचा भाव थेट 20000 रुपयांनी घसरला आहे.

Gold And Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव सतत बदलताना दिसतोय. कधी सोनं आणि चांदी झटक्यात वाडतंय. तर कधी या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव लगेच कोसळताना दिसतोय. असे असतानाच आता 5 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव धाडकन खाली आला आहे. चांदी एका दिवसात तब्बल 20000 रुपयांनी कोसळली आहे. एमसीएक्स अर्था मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर भारतीय वेळेनुसार 9:36 वाजता चांदीचा भाव 2,46,257 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला. याआधीच्या बंद भावाच्या तुलनेत हा भाव 8.4 टक्क्यांनी कमी आहे. बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा चांदीचा भाव 2,52,719 रुपये प्रति किलो होता.

चांदीमध्ये 20000 रुपयांची घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीचा भाव कमी झाला आहे. कॉमेक्सवर चांदीचा भाव 81 डॉलर्स प्रति औंस होता. हा भाव अगोदरच्या बंद भावाच्या तुलनेत 3.74 टक्क्यांनी कमी होता. याच पडझडीचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारात चांदीचा भाव थेट 20 हजार रुपयांनी कमी झालेला पाहायला मिळाला.

बुधवारी चांदीचा भाव नेमका काय होता?

बुधवारी भारतात चांदीचा भाव 320 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 3,20,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता. जानेवारी महिन्यात चांदीचा भाव तेट चार लाख रुपयांपर्यंत वर गेला होता. नंतर मात्र चांदीला उतरती कळा लागल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी चांदीमध्ये आलेल्या तेजीनुसार आज म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी चांदीच्या भावात 20 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आता चांदी 300 रुपये प्रति ग्रॅमच्या हिशोबाने विकली जात आहे.

मुंबईमध्ये चांदीचा भाव काय?

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगलुरू, हैदरबाद, अहमदाबाद, जयपूर यासारख्या मोठ्या शहरांत 1 ग्रॅम चांदीचा भाव 300 रुपये, 100 ग्रॅम चांदीचा भाव 3000 रुपये तर एक किलो चांदीचा भाव तीन लाख रुपये आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0