मुर्तीजापूर येथील 'जीवनज्योती ब्लड डोनर व रुग्णसेवक ग्रुप'च्या समाजकार्याची यवतमाळमध्ये दखल; 'रक्तभूषण पुरस्कार २०२६' ने गौरव!
मुर्तीजापूर येथील 'जीवनज्योती ब्लड डोनर व रुग्णसेवक ग्रुप'च्या समाजकार्याची यवतमाळमध्ये दखल; 'रक्तभूषण पुरस्कार २०२६' ने गौरव!
मुर्तीजापूर:
जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून धैर्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन अंतर्गत 'ब्लड डोनर वेल्फेअर मिशन' (Blood Donor Welfare Mission) द्वारे यवतमाळ येथे "रक्तदाता गौरव व सन्मान सोहळा २०२६" चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मुर्तीजापूर आणि अकोला परिसरात रुग्णसेवा तसेच रक्तदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 'जीवनज्योती ब्लड डोनर व रुग्णसेवक ग्रुप'च्या सदस्यांना प्रतिष्ठित 'रक्तभूषण पुरस्कार २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले.
'रक्तदाता हा केवळ दाता नसून जीवनदाता आहे' हा संदेश घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात, अकोला जिल्ह्यातील श्रीकृष्ण गणेश कोल्हे यांना ३१ ते ५० वेळा रक्तदान या श्रेणीमध्ये त्यांच्या सातत्यपूर्ण, समर्पित व प्रेरणादायी सेवेबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले. त्यांनी आतापर्यंत एकूण ३४ वेळा रक्तदान करून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे महान कार्य केले आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना सांगण्यात आले की, "धैर्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने मिळालेला हा रक्तभूषण पुरस्कार यवतमाळ संपूर्ण टीमने दिलेला मोठा मान आहे. हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून माझ्यासोबत अहोरात्र काम करणाऱ्या संपूर्ण 'जीवनज्योती ब्लड डोनर व रुग्णसेवक ग्रुप'च्या कार्याचा गौरव आहे. भविष्यातही अशाच प्रकारे मानवतेची सेवा अविरतपणे सुरू राहील".
या सोहळ्यादरम्यान फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मुर्तीजापूर व अकोला येथील चमूचा गौरव करण्यात आला. या गौरवाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून 'जीवनज्योती ब्लड डोनर व रुग्णसेवक ग्रुप'च्या कार्यकर्त्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आ
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0