माजरी वस्ती येथे अवैध रेती वाहतुकीवर कारवाई

May 19, 2026 - 16:16
 0  1
माजरी वस्ती येथे अवैध रेती वाहतुकीवर कारवाई

माजरी वस्ती येथे अवैध रेती वाहतुकीवर कारवाई

६ ब्रास रेतीसह हायवा ट्रक जप्त

भद्रावती  ( सुनील दैदावार )
भद्रावती तहसील अंतर्गत माजरी पोलीस ठाणे हद्दीतील माजरी वस्ती परिसरात विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका हायवा वाहनावर माजरी पोलिसांनी कारवाई करत वाहन ताब्यात घेत महसूल विभागाकडे सुपूर्द केले. पोलिसांनी तहसील प्रशासनाला माहिती दिल्यानंतर महसूल विभागाने पुढील कारवाई करत रेतीसह हायवा ट्रक जप्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान वरोरा येथील धनराज चाफले यांच्या मालकीचा MH-34 CA-1212 क्रमांकाचा हायवा ट्रक अंदाजे ६ ब्रास रेतीची अवैध वाहतूक करून माजरी वस्ती परिसरात रेती टाकत होता. याच दरम्यान वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रक जागेवरच अडकून पडला. याबाबत काही नागरिकांनी माजरी पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहन ताब्यात घेतले व पंचनामा करून पुढील कारवाईसाठी महसूल विभागाच्या स्वाधीन केले. जप्त करण्यात आलेला ट्रक दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय भद्रावती येथे जमा करण्यात आला आहे.

ही संयुक्त कारवाई मंडळ अधिकारी समीर वाटेकर, महसूल सेवक राहुल जंगम तसेच माजरी पोलीस पथकाने पार पाडली. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0