राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन 10 जूनला | अजितदादांना समर्पित विशेष कार्यक्रम
१० जुन ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २७ वा वर्धापन दिन समर्पण, संघर्ष आणि संकल्प भावनेतून साजरा होणार
सर्व सहकाऱ्यांनी आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे जनसंपर्क कार्यालय येथे उपस्थित राहण्याचे आवाहन
अमरावती ( प्रतिनिधी )दिनांक -०९ जुन :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २७ वा वर्धापन दिन बुधवार, दि. १० जून २०२६ रोजी आमदार - सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौक स्थित जनसंपर्क कार्यालय येथे सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण व मानवंदना देऊन पक्षाचा गौरव सोहळा साजरा करण्यात येईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत आणि देशभरात पक्षाचा विस्तार करण्यासाठी दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे हा २७ वा वर्धापन दिन पूर्णपणे अजितदादांना समर्पित करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रावहिनी अजित पवार यांच्या नेतृत्वात बुधवार दिनांक १० जून २०२६ रोजी साजरा होणारा हा २७ वा वर्धापन दिन अत्यंत भावनिक आणि समर्पित वातावरणात संपन्न होणार आहे. अजितदादांच्या स्वप्नातील शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांनी प्रेरित होऊन, यशवंतराव चव्हाण यांनी रचलेल्या सुसंस्कृत राजकीय महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा संकल्प करण्याचा हा सोहळा आहे. समर्पण, संघर्ष आणि संकल्प भावनेतून साजरा होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २७ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे प्रमुख,आजी -माजी पदाधिकारी कार्यकर्ते व सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश महासचिव ( संघटन ) आ.संजय खोडके यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0