तळेगाव दशासर पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई
तळेगाव दशासर पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई
५१.२० लाखांचा मुद्देमाल जप्त; चालकासह ट्रक मालकावर गुन्हा दाखल
अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत तळेगाव दशासर पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई करत ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालक व ट्रक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्यात वरली जुगार, अवैध दारू विक्री, गावठी हातभट्टी, अवैध रेती वाहतूक व गोवंश वाहतुकीविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २४ मे रोजी सकाळी तळेगाव दशासर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तळेगाव बसस्टॉप येथे पंचांसमक्ष कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान टाटा हायवा ट्रक क्रमांक MH 28 BB 6066 ची तपासणी केली असता त्यामध्ये विनारॉयल्टी १० ब्रास काळी रेती आढळून आली. पोलिसांनी ५० लाख रुपयांचा ट्रक व १ लाख २० हजार रुपयांची रेती असा एकूण ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोहेकॉ अमर काळे यांच्या फिर्यादीवरून चालक इमरान खान रहेमत खान (वय ३१, रा. मलकापूर, शेंदुर्जनाघाट, ता. वरुड) तसेच ट्रक मालक अजय शामराव ढवळे (वय २७, रा. दस्तूरनगर, अमरावती) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ व मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार, पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार किरण औटे, पोहेकॉ अमर काळे, पोकॉ यशवंत काळे व पोकॉ गौतम गवळे यांनी केली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0