गाडगेनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई — सोलर दुकानातील चोरी 48 तासांत उघड
गाडगेनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई — सोलर दुकानातील चोरी 48 तासांत उघड
अमरावती (प्रतिनिधी) – गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत सोलर सिस्टिम दुकानात झालेल्या मोठ्या चोरीचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या 48 तासांत उघडकीस आणत आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश रामेश्वर कसेसिया (वय 45, रा. विलासनगर, अमरावती) यांनी 3 मे 2026 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांनी 2 मेच्या रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडले असता आतील शटरचे लॉक तोडलेले व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले. अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडून दुकानातील सुमारे ₹2.96 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता.
या घटनेनंतर गाडगेनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान उमेश शिवनिगदास भोसले (वय 21, रा. पारची बेडा, राजुरा) तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण ₹1.91 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त रमेश युमाळ, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात डीबी पथक प्रमुख पो.उपनि. योगेश श्रीवास व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास गाडगेनगर पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0