२५ व २६ मे रोजी बँक संप; कर्मचाऱ्यांचा न्याय मागण्यांसाठी एल्गार

May 3, 2026 - 17:34
May 3, 2026 - 17:36
 0  2
२५ व २६ मे रोजी बँक संप; कर्मचाऱ्यांचा न्याय मागण्यांसाठी एल्गार

२५ व २६ मे रोजी बँक संप; कर्मचाऱ्यांचा न्याय मागण्यांसाठी एल्गार
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) मधील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २५ व २६ मे रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. ही माहिती श्री. एस. एस. खांडेकर यांनी दिली.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स च्या नेतृत्वाखाली हा आंदोलन कार्यक्रम राबविण्यात येणार असून, २ मेपासून विविध टप्प्यांत आंदोलन सुरू झाले आहे. यामध्ये स्ट्राईक नोटीस देणे, बॅज लावणे, सोशल मीडिया मोहिमा, लंच टाइम निदर्शने, तसेच धरणे आंदोलन यांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करणे, पीएलआय (परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह) योजनेवर द्विपक्षीय चर्चेतून तोडगा काढणे आणि एकतर्फी योजना लागू न करण्याचा समावेश आहे.
संघटनांनी स्पष्ट केले की, या मागण्या केवळ कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नसून बँकिंग व्यवस्थेच्या सुदृढतेसाठीही आवश्यक आहेत. २५ व २६ मे रोजी होणाऱ्या संपामुळे देशभरातील बँक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0