अमरावती : गाडगेनगर पोलिसांची मोठी कारवाई, घरफोडी प्रकरणातील आरोपी अटकेत

May 10, 2026 - 15:31
 0  0
अमरावती : गाडगेनगर पोलिसांची मोठी कारवाई, घरफोडी प्रकरणातील आरोपी अटकेत

अमरावती : गाडगेनगर पोलिसांची मोठी कारवाई, घरफोडी प्रकरणातील आरोपी अटकेत
अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत आरोपीला अटक करून तब्बल २ लाख ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संत कबीर नगर येथील रहिवासी संगिता राजू सावळे (वय ४०) यांनी घरातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. फिर्यादी महिला २५ एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ दरम्यान कामानिमित्त बाहेर गेल्या असता अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने लंपास केले होते.
या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अप.क्र. ४७७/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान गाडगेनगर डी.बी. पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर निंभोरा बडनेरा रोड परिसरातून संशयित आरोपी अशोक बाबुलाल जयस्वाल (वय ५०, रा. न्यू गणेश कॉलनी, मारोती नगर, अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केली असता आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे १७ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, पोलीस उपआयुक्त श्री. गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शिवाजीराव बचाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोउपनि. सागर ठाकरे, सफौ. अशोक वाटाणे, मनीष सावरकर, निलेश जुनघरे, अमोल यादव, विनोद मालवे, आशिष ठाकरे, सिद्धार्थ शृंगारे आणि सचिन गौरखेडे यांनी सहभाग घेतला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0