अल्पवयीन मुलीचा शोध; AHTU पथकाची मोठी कारवाई, आरोपी ताब्यात

Minor Girl Rescued; Major Action by AHTU Team, Accused Detained

May 26, 2026 - 18:10
 0  0
अल्पवयीन मुलीचा शोध; AHTU पथकाची मोठी कारवाई, आरोपी ताब्यात

अल्पवयीन मुलीचा शोध; AHTU पथकाची मोठी कारवाई, आरोपी ताब्यात
अमरावती, दि. २५ मे — तब्बल अनेक महिन्यांपासून तपासावर असलेल्या अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात अमरावती ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) महत्त्वपूर्ण यश मिळवत आरोपीसह मुलीचा शोध लावला आहे.
पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे अपराध क्र. ४४६/२०२५ अंतर्गत कलम १३७(२) बीएनएसनुसार दाखल प्रकरणात १४ ऑगस्ट २०२५ पासून तपास सुरू होता. अल्पवयीन पीडित मुलगी व आरोपी दीर्घकाळ सापडत नसल्याने तपासाची सूत्रे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील AHTU कक्षाकडे सोपविण्यात आली होती.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पथकाने २५ मे रोजी अमरावती शहर हद्दीतील नवसारी परिसरातील ऑटो स्टॉपवर सापळा रचून आरोपी अश्विन कुमार रामगुवल यादव (२५, रा. शिरजगाव कोरडे, ता. चांदूर रेल्वे) व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपीला चांदूर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
महिला व बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या AHTU कक्षाने आतापर्यंत पोस्टे स्तरावर उघडकीस न आलेल्या तब्बल ५४ गुन्ह्यांचा छडा लावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम व अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रियंका भोयर यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने पार पाडली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0