रशियाकडून थेट नाकेबंदी, भारताला मोठा धक्का, थेट 70 वर्षांची मैत्रीच…

Mar 11, 2026 - 13:33
 0  5
रशियाकडून थेट नाकेबंदी, भारताला मोठा धक्का, थेट 70 वर्षांची मैत्रीच…

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध कायमच चांगले राहिले आहेत. मात्र, अमेरिकेने भारतावर रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अनेक निर्बंध लादले. दोन्ही देशातील संबंध ताणल्याचे बघायला मिळत आहे. थेट मैत्रीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर खळबळ उडाली. इराणकडूनही ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ले करण्यात आली. यासोबतच या युद्धात प्रमुख निशाण्यावर आले ते म्हणजे तेल शुद्धीकरण कारखाने. इराणसह आखाती देशातील तेल शुद्धीकरण कारखाने आणि डेपोंना टार्गेट करत हल्ले करण्यात आली. ज्याचा परिणाम तेल पुरवठा जवळपास बंद झाला. यासोबतच इराणकडून महत्वाचा हार्मुज सागरीमार्गही बंद करण्यात आला. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, याकरिता मोठे निर्बंध अमेरिकेने घातले. मात्र, या युद्धादरम्यान अचानक अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली.

भारत आणि रशिया गेल्या 70 वर्षांपासूनचे चांगले मित्र आहेत. प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळात एकमेकांच्या बाजूने उभे राहिले. रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध सुरू असताना अमेरिकेने भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर प्रचंड दबाव आणला. अमेरिकेच्या दबावमुळे भारतालाही रशियाकडून तेल खरेदी कमी करावी लागली. यादरम्यान रशियाकडून भारताला मोठी तेलावर सूट दिली जात होती. मात्र, अमेरिकेच्या दबावामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली.

आता भारत आणि रशियाच्या 70 वर्ष जुन्या मैत्रीत फुट पडल्याचे स्पष्ट झाले. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, पण रशियानेही भारताला अगोदर दिलेली सूट आता रद्द करून थेट बाजाराभावाप्रमाणेच भारताला तेल खरेदी करावी लागेल असे स्पष्ट केले. 2026 मध्ये 13 डॉलर प्रति बॅरल इतकी सूट रशिया भारताला देत होता. मात्र, अमेरिकेमुळे भारताने फेब्रुवारी महिन्यात फक्त 19.3 इतकेच कच्चे तेल रशियाकडून खरेदी केले.

यामुळे भारताचा खरा मित्र दुरावला आणि आता रशियाने स्पष्ट केले की, बाजारा भावाप्रमाणेच भारताला तेल मिळेल. 108 प्रति डॉलर भारताला तेल मिळू शकते. अमेरिकेमुळे भारत आणि रशियाच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याचे सांगितले जाते. कायमच विषय कोणताही असो भारताची साथ रशियाने दिली आहे. युक्रेन युद्धादरम्यान रशिया एका वेगळ्या काळातून जात आहे. अमेरिका कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होती.

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा थेट फायदा प्रत्यक्षातपणे रशियाला झाला. जगातील अनेक देशात तेलाची मोठी टंचाई निर्माण झाली. कच्च्या तेलाची प्रचंड मागणी वाढली. यामध्ये रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाटली. ज्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा नक्कीच मिळू शकते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0