President Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या शेगावात, संत गजानन महाराजांचं दर्शन घेणार, महा आरोग्य मेळाव्याचे उद्धघाटन करणार

Feb 24, 2026 - 14:22
 0  3
President Droupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या शेगावात, संत गजानन महाराजांचं दर्शन घेणार, महा आरोग्य मेळाव्याचे उद्धघाटन करणार

Sant Gajanan Maharaj Shegaon : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या शेगाव दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्या महा आरोग्य मेळव्याचं उद्धघाटन करणार आहेत. त्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10 जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा शेगावात दाखल आहेत.

President Droupadi Murmu at Shegaon : बुलढाणा जिल्ह्यात उद्या महामहीम द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते महा आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रपती शेगाव दौऱ्यावर येत असून, त्या संत गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत आहे. या दौरासाठी राज्यातील 10 जिल्ह्यातील पोलीस शेगावात तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या दौर्‍यामुळे संपूर्ण शेगाव शहरात उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

गजानन महाराज मंदिरात भाविकांच्या दर्शनामध्ये मोठा बदल

येत्या 25 फेब्रुवारी रोजी महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या शेगाव दौऱ्यावर येणार असून याकरिता श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरातील दर्शनाकरिता भाविकांना दर्शनाच्या वेळेत काही बदल करण्यात आले आहे. श्रींचे दर्शनाकरिता महामहीम राष्ट्रपती २५ फेबुवारी, शेगांवला येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार त्यांना सर्वोच्च राज शिष्टाचार प्रदान करण्यात आलेला असल्याने सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खबरदारीचे उपाय सूचविण्यात आले आहेत. त्यानुसार मंगळवार २४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रशासनाचे वतीने रंगीत तालीम घेण्यात येणार असून श्रींचे दर्शन सकाळी १०.३० ते १२.०० वाजोपर्यंत स्थगित राहील. त्याचप्रमाणे बुधवार २५ फेब्रुवारी २०२६ रोजी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे श्री दर्शनास आगमन होत असल्याने श्रींचे दर्शन सकाळी ७.३० ते दु. १२.३० वा. पर्यंत स्थगित राहणार आहे. त्यानंतर श्री दर्शन व्यवस्था ही पूर्ववत सुरु राहील, याची भाविकांनी नोंद घ्यावे असे आवाहन संस्थांकडून करण्यात आले आहे. तर संस्था आणि प्रशासनास सहकार्य करावे, असेही नम्र विनंती श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या वतीने करण्यात आली आहे.

आयुष मेळाव्याला उपस्थित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राष्ट्रीय आयुष्य मेळाव्यासाठी सकाळी हेलिकॉप्टरने संतनगरी शेगाव येथे दाखल होतील. सर्वात अगोदर त्या शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात जातील. तिथे श्रींच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर विसावा परिसरातील आयुष मेळाव्याला त्या उपस्थित असतील. तिथे त्या उपस्थितींना मार्गदर्शन करतील. गेल्या पंधरा दिवसांपासून राष्ट्रपती येणार असल्याने प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तयारी लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0