पिंपळद गावात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दर्यापूर/२४ – मंगळवार, २१ एप्रिल रोजी, तालुक्यातील पिंपळद गावात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणाचे नाव सरजेराव सुभाषराव नावाळकर (३६) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरजेराव नावाळकर यांनी मंगळवारी दुपारी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान आणि वाढत्या कर्जामुळे या तरुण शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. पिंपळद गावात शोककळा पसरली आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0