अजित पवार एकटे नाही तर हा मोठा नेताही अपघाताच्या दिवशी जाणार होता बारामतीला, शेवटच्या क्षणी…

Feb 5, 2026 - 17:28
 0  0
अजित पवार एकटे नाही तर हा मोठा नेताही अपघाताच्या दिवशी जाणार होता बारामतीला, शेवटच्या क्षणी…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांचे जाणे चटका लावू जाणारे आहे. यादरम्यान राज्यातील एका मोठ्या नेत्याने एक दावा केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार विमान अपघातात गंभीर जखमी झाले. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचे विमान आकाशात एका बाजूला झुकताना दिसले. काही क्षणात मोठा अपघात या विमानाचा झाला आणि मोठे चार ते पाच स्फोट झाले. विमान अपघाताबद्दल दररोज वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि संपूर्ण पक्षाची धुरा आपल्या हातात घेतली. मात्र, पवार कुटुंबियांसोबत कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचे सूत्रे आपल्या हातात घेतले.

 ज्यावर शरद पवार स्पष्टपणे बोलताना दिसले.आता नुकताच अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे. अजित पवार यांच्यासोबत राज्यातील अजून एक मोठा नेता मुंबईहून बारामतीसाठी जाणार होता. विशेष म्हणजे दोघेही एकाच विमानातून प्रवास करणार होते. मात्र, त्यांना पोहोचण्यास उशीर झाल्याने अजित पवार पुढे निघून गेले.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. ज्यादिवशी भीषण अपघात झाला, त्यादिवशी महादेव जानकर हे देखील त्यांच्यासोबत विमानातून जाणार होते. महादेव जानकर यांनी म्हटले की, त्यादिवशी अजित पवार यांनी मला बारामतीमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिले होते. मी आणि अजित पवार एकाच विमानातून जाणार होतो.

पण मला पोहोचायला उशीर झाला. अजित पवार यांचे विमान ठरलेल्या वेळेत निघून गेले. मला पोहोचण्यासाठी उशीरा झाला आणि मी बारामतीला जाणे रद्द केले. मला विमानतळावर जाण्यास उशीर झाल्याने माझा जीव वाचला असला तरीही राज्याने एक मोठा नेता नक्कीच गमावले आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर दु:ख व्यक्त करताना महादेव जानकर हे दिसले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0