मुर्तिजापूर पोलिसांची धडक कारवाई; चोरीचा ₹1.10 लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल फिर्यादीला परत

Jul 25, 2026 - 14:15
 0  0
मुर्तिजापूर पोलिसांची धडक कारवाई; चोरीचा ₹1.10 लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल फिर्यादीला परत

मुर्तिजापूर पोलिसांची धडक कारवाई; चोरीचा ₹1.10 लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल फिर्यादीला परत

मुर्तिजापूर 

मुर्तिजापूर शहर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून आरोपीकडून जप्त केलेला ₹1 लाख 10 हजार किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल मूळ फिर्यादीच्या ताब्यात सुपूर्द केला.

मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अपराध क्र. 69/2026 अंतर्गत कलम 380, 354 व 357 भादंवि अन्वये गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

परत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 4 ग्रॅम सोन्याची लगड (अंदाजे किंमत ₹60,000) आणि 200 ग्रॅम चांदीची लगड (अंदाजे किंमत ₹50,000) असा एकूण ₹1.10 लाखांचा ऐवज आहे.

शनिवार (25 जुलै) रोजी हा मुद्देमाल शक्तीसिंग दिलीपसिंग ठाकूर (रा. आदर्श कॉलनी, स्टेशन विभाग, मुर्तिजापूर) यांना पोलीस ठाण्यात सन्मानपूर्वक परत करण्यात आला. चोरीस गेलेला ऐवज सुरक्षित परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी, म.स.पो.उ.नि. उज्वला भाले आणि मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईचे शहरात कौतुक होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0