फ्रेजरपुरा पोलिसांची धडक कारवाई; दोन सराईत आरोपी अवैध शस्त्रांसह जेरबंद
फ्रेजरपुरा पोलिसांची धडक कारवाई; दोन सराईत आरोपी अवैध शस्त्रांसह जेरबंद
अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दोन रेकॉर्डवरील आरोपींना अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई दिनांक 21 मे 2026 रोजी करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी
1) सचिन शामराव वानखेडे (वय 43), रा. लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा
आणि
2) वैभव अजय बनसोड (वय 26), रा. राहुल नगर, बिच्छू टेकडी, अमरावती
हे दोघेही अवैधरित्या शस्त्र बाळगत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
माहितीच्या आधारे सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्यांच्याकडून अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली असून दोघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0