IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका

Apr 10, 2026 - 22:57
 0  5
IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका

आयपीएल 2026 स्पर्धेतील 16वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. या सामन्यात आरसीबीची सुरूवात डळमळीत झाली. त्यात फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 16व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी निवडली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फिल सॉल्ट आणि विराट कोहली सलामीला उतरला. पण पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टची विकेट पडली. गोल्डन डकवर फिल सॉल्ट तंबूत गेला. त्यामुळे त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुर्मिळ आणि नकोशा विक्रमाच्या यादीत नोंद झाली आहे. या यादीत तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. तर फिल सॉल्टसह ड्वेन स्मिथ या यादीत समाविष्ट आहे. या यादीत पार्थिव पटेल पहिल्या स्थानावर आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा सामन्याच्या पहिल्या चेंडूवर बाद होण्याचा नकोसा विक्रम रचला आहे.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात जोफ्रा आर्चरने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू फिल सॉल्ट खेळताना चुकला.त्याने या चेंडूवर जोरदा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागला आणि उंच उडाला. यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने कोणतीही चूक न करता सोपा झेल घेतला आणि पहिल्याच चेंडूवर सॉल्टला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. आयपीएल स्पर्धेत पार्थिव पटेल चार वेळा शून्यावर बाद आहे. त्यानंतर ड्वेन स्मिथ, पृथ्वी शॉ, केएल राहुल आणि फिल सॉल्ट हे तीन वेळा शून्यावर बाद झाले आहेत. त्यामुळे फिल सॉल्टची नको त्या विक्रमात नोंद झाली आहे.

आयपीएल 2023 मध्ये अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध दिल्लीकडून खेळताना मोहम्मद शमीने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. त्यानंतर आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने त्याला पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला होता. आता जोफ्रा आर्चरने त्याला बाद केलं.

दुसरीकडे, जोफ्रा आर्चरने आयपीएल स्पर्धेत तिसऱ्यांदा पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे. या यादीत भारताचा मोहम्मद शमी पहिल्या स्थानावर आहे. त्याने पाच वेळा ही किमया साधली आहे. तर प्रवीण कुमार, उमेश यादव, ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा, भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा, पॅट कमिन्स आणि जोफ्रा आर्चर यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0