IPL 2026 Orange Cap Holder: मुंबईच्या पराभवानंतर मोठा उलटफेर, रोहितला वैभवकडून झटका, ऑरेंज कॅप कुणाकडे?
IPL 2026 Orange Cap Holder: ऑरेंज कॅपचं समीकरण 1-1 धावेनंतर बदलत आहे. त्यामुळे फलंदाजांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. या 19 व्या मोसमात 13 सामन्यानंतर ऑरेंज कॅपचा मानकरी कोण ठरलाय? जाणून घ्या.
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) मंगळवारी 7 एप्रिलला मुंबई इंडियन्स टीम राजस्थान रॉयल्सला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखण्यात अपयशी ठरली. राजस्थानने गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये रॉयल असा विजय मिळवला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या 11 षटकांच्या सामन्यात राजस्थानचे सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी धमाका केला. दोघांनी वादळी खेळी करुन राजस्थानच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. राजस्थानने मुंबईसमोर 151 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 9 विकेट्स गमावून 123 धावाच करता आल्या. राजस्थानने अशाप्रकारे रियान पराग याच्या नेतृत्वात आपल्या मोहिमेतील तिसरा सामना हा 27 धावांनी नावावर केला. राजस्थानने यासह विजयी हॅट्रिक पूर्ण केली.
वैभव-यशस्वीला मोठा फायदा
राजस्थानला 150 धावांपर्यंत पोहचवण्यात वैभव आणि यशस्वी या दोघांना प्रमुख योगदान दिलं. दोघांनी 5 ओव्हरमध्ये 80 रन्सची पार्टनरशीप करुन राजस्थानला वादळी सुरुवात करुन दिली. वैभवने 14 बॉलमध्ये 39 रन्सची झंझावाती खेळी केली. तर यशस्वी नाबाद परतला. यशस्वीने राजस्थानसाठी सर्वाधिक धावा केल्या. राजस्थानच्या ओपनरने 32 बॉलमध्ये 10 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 77 रन्स केल्या. वैभव आणि यशस्वीला या खेळीचा मोठा फायदा झाला. राजस्थानच्या या दोन्ही फलंदाजांनी 19 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप 5 मध्ये धडक दिली.
यशस्वी जैस्वाल ऑरेंज कॅपचा मानकरी
यशस्वी या खेळीसह ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. यशस्वीने 67 वी धाव घेताच दिल्ली कॅपिट्सच्या समीर रिझवी याला पछाडलं. यशस्वी यासह सर्वाधिक धावा करणारा (13 व्या सामन्यापर्यंतची आकडेवारी) पहिला फलंदाज ठरला. वैभवने रोहित शर्मा याला मागे टाकत चौथं स्थान पटकावलं. त्यामुळे रोहितीची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.
टॉप 5 मध्ये राजस्थान रॉयल्सचे 2 फलंदाज, रोहित कितव्या स्थानी?
समीर रिझवी याचा अपवाद वगळता सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 पैकी 4 फलंदाजांनी 3 सामने खेळले आहेत. यशस्वीने 3 सामन्यांमध्ये सर्वाधिक 170 रन्स केल्या आहेत. यशस्वीमुळे समीरची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. समीरने 2 सामन्यांत 160 रन्स केल्या आहेत.
हेन्रिक क्लासेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. क्लासेनने 3 सामन्यांमध्ये 145 रन्स केल्या आहेत. तर वैभवच्या नावावर 3 मॅचनंतर 122 रन्सची नोंद आहे. रोहित शर्मा याने 3 सामन्यांत 118 धावा केल्या आहेत.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0