CSK vs SRH: अभिषेक शर्माने 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक, अशी कामगिरी करत हैदराबादसाठी नोंदवला विक्रम

Apr 18, 2026 - 20:55
 0  1
CSK vs SRH: अभिषेक शर्माने 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक, अशी कामगिरी करत हैदराबादसाठी नोंदवला विक्रम

आयपीएल स्पर्धेतील 27वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात अभिषेक शर्माची बॅट चांगलीच तळपली. त्याने 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 27व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माच्या फलंदाजीची धार पाहायला मिळाली. या सामन्यात त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षावर केला. तसेच 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. 

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नाव नोंदवलं आहे. त्याने अर्धशतकी खेळी करताना 5 चौकार आणि 4 षटकार मारले. म्हणजेच त्याने 44 धावा फक्त 9 चेंडूत केल्या. तर सहा धावांसाठी 6 चेंडू घेतले. 

सनराझर्स हैदराबादसाठी कमी चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा मान त्याने मिळवला आहे. यापूर्वी त्याच्याच नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे. 2024 मध्ये त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तर ट्रेव्हिस हेडने 2024 मध्ये दोन 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं.

अभिषेक शर्माने 22 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्याने त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. 268.18 च्या स्ट्राईक रेटने त्याने 59 धावांची खेळी केली. जेमी ओव्हरटनच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने त्याचा झेल पकडला आणि बाद झाला.

आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे. त्याने 2023 मध्ये केकेआरविरुद्ध 13 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर केएल राहुल, पॅट कमिन्स आणि रोमारियो शेफर्ड यांनी 14 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. तर 15 चेंडूत अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या पंगतीत अभिषेक शर्मा बसला आहे. 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0