अमेरिका संकटात! थेट भयंकर धक्का, तब्बल 3 वर्षातील सर्वाधिक वाढ, गॅस..

Mar 31, 2026 - 13:49
 0  6
अमेरिका संकटात! थेट भयंकर धक्का, तब्बल 3 वर्षातील सर्वाधिक वाढ, गॅस..

इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका अमेरिकेला बसत आहे. अमेरिकेत महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बघायला मिळत आहे. इतरांना फसवण्याच्या चक्करमध्ये असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: च्या जनतेला संकटात आणल्याचे बघायला मिळतंय.

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. या युद्धाचा थेटपणे अमेरिकेवर परिणाम होत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. अनेक देश या युद्धात होरपळले जात आहेत. जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. सर्वांनाच याचा फटका बसला आहे. अमेरिकेला युद्ध थांबवायचे असेल तर प्रमुख सहा इराणच्या मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. अमेरिकेकडून युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. इराण आपल्या मागण्यांवर ठाम आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती स्थिर ठेवण्याचे मोठे आव्हान अमेरिकेपुढे आहे. जग अमेरिकेला दोषी ठरवत आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला करून सर्वांना वेठीस धरल्याचे सांगितले जात आहे. एकही देश अमेरिकेच्या मदतीला या युद्धात उतरला नाही. अमेरिकेने थेटपणे अनेक देशांकडे मदतही मागितली. पण एकही देश साथ देण्याकरिता पुढे आला नाही.

युद्धाचा फटका फक्त इस्त्रायल आणि इराणला बसेल असा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. पण अमेरिकेलाही मोठा फटका बसला. अमेरिकेत गॅसच्या दरात तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाली. ही वाढ तीन वर्षातील सर्वाधिक आहे. युद्ध सुरू झाल्यापासूनच ही गॅस दर वाढ होत आहे. अमेरिकेत गॅसच्या दरात प्रती कॅन 4 डॉलरने वाढ झाली.

युद्ध सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला. एक महिन्यातच अमेरिकेत 30 टक्क्यांनी गॅसच्या किमती वाढल्या आहेत. ही तीन वर्षातील सर्वाधिक वाढ आहे. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेतील लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकर इराणसोबतचे युद्ध थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली.

इराणसोबतच्या युद्धाचा थेटपणे फटका अमेरिकेलाही बसताना दिसत आहे. फक्त गॅसच्या दरातच नाही तर इतरही गोष्टींच्या भावात मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. येणारी आकडेवारी धक्कादायक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत संतापाचे वातावरणही बघायला मिळत आहे. त्यामध्येच 30 टक्क्यांनी गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दणका बसला आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0