एक वेळेस युद्ध परवडलं पण… किम जोंगने अमेरिकेला दिला असा दणका की, डोनाल्ड ट्रम्प यांना फुटला घाम

Apr 1, 2026 - 23:10
 0  6
एक वेळेस युद्ध परवडलं पण… किम जोंगने अमेरिकेला दिला असा दणका की, डोनाल्ड ट्रम्प यांना फुटला घाम

North Korea vs USA : उत्तर कोरियाने अमेरिकेला मोठा दणका दिला आहे. कोरियांना अमेरिकन कंपन्यांवर डिजिटल हल्ला केला आहे, ज्यामुळे अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्र हादरून गेले आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देश होरपळून निघाले आहेत. तसेच जगातील इतरही अनेक देशांना या युद्धाचा फटका बसला आहे. अशातच आता या युद्धाने एक नवीन वळण घेतले आहे, इराणने आता अमेरिकन टेक कंपन्यांवर हल्ल्याचा इशारा दिला असून बहरीनमधील अॅमेझॉनच्या एका कार्यालयावर हल्लाही केला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडालेली आहे. अशातच आता उत्तर कोरयाने अमेरिकेला मोठा दणका दिला आहे. कोरियांना अमेरिकन कंपन्यांवर डिजिटल हल्ला केला आहे, ज्यामुळे अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्र हादरून गेले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

किम जोंगचा अमेरिकेला दणका

समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या हॅकर्सनी अमेरिकेतील हजारो कंपन्यांना लक्ष्य करत मोठ्या सप्लाय-चेनवर सायबर हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. इराण अमेरिकन टेक कंपन्यांना धमकी देत असताना किमने अमेरिकेची झोप उडवली आहे. मंगळवारी सकाळी सुमारे तीन तासांसाठी कोरियाच्या हॅकर्सनी Axios नावाच्या लोकप्रिय ओपन-सोर्स सॉफ्टवेअरच्या डेव्हलपर अकाउंटमध्ये शिरकाव केल्याचे समोर आले आहे.

हल्ल्याचा परिणाम काय होणार?

उत्तर कोरियाच्या या हल्ल्यामुळे हजारो कंपन्यांची झोप उडाली आहे. कारण हेल्थकेअरपासून फायनान्स आणि क्रिप्टोकरन्सीपर्यंत जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये या सॉफ्टवेअरचा वापर होत आहे. हॅकर्सने हॅक केलेल्या तीन तासांच्या कालावधीत हॅकर्सनी सॉफ्टवेअरमध्ये घातक कोड टाकला. ज्यांनी हे अपडेट डाउनलोड केले त्यांच्या सिस्टिमवर थेट नियंत्रण हॅकर्सकडे गेले आहे. तज्ञांच्या मते या हल्ल्याचा मुख्य उद्देश अब्जावधी डॉलरची क्रिप्टोकरन्सी चोरणे हा असून, त्यातून किम जोंग यांच्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांना निधी पुरवला जाऊ शकतो.

ट्रंपसाठी डोकेदुखी का आहे?

डोनाल्ड ट्रंप सत्तेवर असताना त्यांच्यासमोर चीन आणि इराणसारखी मोठी आव्हाने आहेत. त्यात आता उत्तर कोरियाचा सायबर युद्धाचा धोका अधिक गंभीर ठरत आहे. कारण व्हाइट हाऊसच्या आधीच्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा मोठा खर्च डिजिटल चोरीतून भागवला जातो. हे रोखण्यात अपयश आल्यास त्यांची अणुशक्ती वाढू शकते. तज्ञांच्या मते, आज कंपन्या पुरेशा सुरक्षा उपायांशिवाय AI चा वापर करून सॉफ्टवेअर तयार करत आहेत, ज्यामुळे हॅकर्सना संधी मिळत आहे. मँडियंट यांच्या मते, या हल्ल्याचे नुकसान पूर्णपणे समजून घेण्यासाठी अनेक महिने लागू शकतो.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0