अखेर भारताला सर्वात मोठं गिफ्ट, होर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून गुड न्यूज, थेट घोषणाच केली

Apr 15, 2026 - 22:50
 0  2
अखेर भारताला सर्वात मोठं गिफ्ट, होर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून गुड न्यूज, थेट घोषणाच केली

Donald Trump : भारतासह संपूर्ण जगासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनीवरील नाकेबंदी हटवण्याची घोषणा केली आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता भारतासह संपूर्ण जगासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज सामुद्रधुनीवरील नाकेबंदी हटवण्याची घोषणा केली आहे. ट्रंप यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘आता आम्ही होर्मुझ पूर्णपणे खुले करत आहोत. याबाबत आमची चीनशी चर्चा झाली आहे. चीन इराणला शस्त्रे देणार नाही, त्यामुळे आम्ही ते कायमचे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.’ ट्रंप यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा होर्मुजमधील अमेरिकेची नाकेबंदी पूर्णपणे अपयशी ठरल्याची बातमी समोर आली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, ‘आता कधीही होर्मुज बंद होण्याची वेळ येणार नाही. हे सर्व देशांसाठी खुले झाले आहे. यामुळे मी खूप आनंदी आहे.’ युद्धविरामाच्या काळात अलीकडेच अशी बातमी आली होती की चीनने इराणला काही शस्त्रे पाठवली आहेत. यावर बोलताना ट्रंप यांनी म्हटले की, मी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्र लिहून शस्त्रे न देण्याची विनंती केली होती, आणि चीनने ती मान्य केली आहे. मी जेव्हा चीनला जाईन, तेव्हा जिनपिंग मला मिठी मारतील. आमचे संबंध चांगले आहेत.’

ट्रंप यांनी नाकेबंदी हटवण्यामागील कारणे

वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार, होर्मुजच्या बाहेर अमेरिकेची नाकेबंदी अपयशी ठरली. नाकेबंदीच्या पहिल्याच दिवशी सुमारे 20 जहाजे होर्मुजमधून गेली आणि अमेरिकन सैन्य त्यांना थांबवू शकले नाही. यातील बहुतांश जहाजे चीनची होती, आणि त्यांना थांबवणे अमेरिकेसाठी धोकादायक ठरू शकले असते, कारण चीननेही त्यांना कठोर इशारा दिला होता.

ब्रिटन आणि फ्रान्ससारखे देश होर्मुजच्या मुद्द्यावर सक्रिय झाले होते. फ्रान्सचे म्हणणे होते की युद्धात सहभागी देशांनी होर्मुजपासून दूर राहावे. युद्ध करणारे देश संपूर्ण जगाला त्रास देऊ शकत नाहीत. ब्रिटन आणि फ्रान्स यासाठी व्यापक आघाडी तयार करत होते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना माघार घ्यावी लागली.

अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये या आठवड्याच्या शेवटी शांतता कराराबाबत बैठक प्रस्तावित आहे. या बैठकीपूर्वी होर्मुजमध्ये अमेरिकेची प्रतिमा खराब झाली असती, तर वाटाघाटींमध्ये ट्रंप यांची टीम कमकुवत पडली असती. त्यामुळे चर्चेपूर्वीच ट्रंप यांनी हा निर्णय घेतला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0