IPL 2026 : आयपीएलमधील दहा कर्णधारांचा पगार तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या एका क्लिकवर

Mar 25, 2026 - 20:26
 0  6
IPL 2026 : आयपीएलमधील दहा कर्णधारांचा पगार तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. पण तुम्हाला माहिती आहे. सध्या असलेल्या दहा कर्णधारांचा पगार किती आहे? चला जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. पहिल्या सामन्यापासून टॉप 4 मध्ये राहण्याची शर्यत सुरू होणार आहे. कारण टॉप 4 मधील संघांना एलिमिनेटर आणि प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे पहिल्या सामन्यापासून विजयी सुरूवात करण्याचा संघांचा प्रयत्न असणार आहे. मागच्या वर्षी आरसीबीने जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे त्यांना जेतेपद राखण्याचं आव्हान आहे. असं असताना दहा फ्रेंचायझी आपल्या कर्णधारासाठी किती पैसे मोजतात हा प्रश्न आहे.

1. आयपीएल स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू आणि कर्णधार म्हणून आघाडीवर ऋषभ पंतचं नाव येतं. लखनौ सुपर जायंट्सने 2025 स्पर्धेतील मेगा लिलावात त्याच्यासाठी 27 कोटी मोजले होते. पण काही खास करू शकला नाही. यंदाच्या पर्वात त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत.

2. आयपीएल स्पर्धेतील दुसरा महागडा खेळाडू आणि कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचं नाव येतं. श्रेयस अय्यरसाठी 2025 मेगा लिलावात पंजाब किंग्सने 26.75 कोटी मोजले होते. त्याने आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं. मागच्या पर्वात पंजाब किंग्सला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं होतं. पण जेतेपद हुकलं.

3. चेन्नई सुपर किंग्स संघाची धुरा असलेला ऋतुराज गायकवाड हा तिसरा महागडा कर्णधार आहे. 29 वर्षीय ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्सकडून 18 कोटी रुपये मिळतात.

4. अक्षर पटेलकडे दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा आहे. मागच्या पर्वात पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केली होती. पण नंतर गाडी रूळावरून घसरली. आता पुन्हा एकदा जोमाने तयारी सुरू केली आहे. अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्सकडून 16.50 कोटी मिळतात.

5 . शुबमन गिललाही गुजरात टायटन्सकडून 16.50 कोटी मिळतात. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने ट्रेड विंडोच्या माध्यमातून घेतल्यानंतर शुबमन गिलकडे संघाची धुरा आली.

6. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याला 16.35 कोटी मिळतात. पण त्याच्या नेतृत्वात अजूनही मुंबई इंडियन्सला जेतेपदाची प्रतिक्षा आहे.

7. रियान परागकडे या पर्वापासून अधिकृतरित्या संघाची धुरा आली आहे. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडे गेल्याने आता रियान पराग राजस्थान रॉयल्स नेतृत्व करणार आहे. त्याला फ्रेंचायझीकडून 14 कोटी मिळतात.

8. पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा इशान किशनच्या खांद्यावर आली आहे. त्याला फ्रेंचायझीकडून 11 कोटी 25 लाख रूपये मिळतात.

9. रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने मागच्या वर्षी     जेतेपद मिळवलं होतं. आरसीबीने 18 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जेतेपद मिळवलं. रजत पाटीदारला फ्रेंचायझीकडून 11 कोटी मिळतात.

10. आयपीएल 2026 सर्वात कमी पगार घेणारा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेची नोंद आहे. त्याच्याकडे कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपद आहे. त्याला केकेआरने मेगा लिलावात 1.5 कोटी रूपये खर्च करून घेतलं होतं.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0