Dhurandhar The Revenge : आज जे कोणी ‘धुरंधर : द रिव्हेंज’ पहायला जाणार आहेत, त्यांनी कृपाकरुन..चित्रपटाच्या समर्थकांनी मोर्चा संभाळला

Mar 18, 2026 - 20:47
 0  9
Dhurandhar The Revenge : आज जे कोणी ‘धुरंधर : द रिव्हेंज’ पहायला जाणार आहेत, त्यांनी कृपाकरुन..चित्रपटाच्या समर्थकांनी मोर्चा संभाळला

Dhurandhar The Revenge : बहुचर्चित ‘धुरंधर : द रिव्हेंज’चे शो आजपासून सुरु होत आहेत. खरंतर चित्रपट उद्या 19 मार्चला प्रदर्शित होणार आहे. पण चित्रपटाचे प्रीव्यू शोज आज संध्याकाळपासून पाहता येतील. या चित्रपटाचा एका मोठा समर्थक वर्ग आहे, जो डायरेक्टरच्या बाजूने लढायला तयार आहे.

आदित्य धर दिग्दर्शित बहुचर्चित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ चा दुसरा भाग उद्या 19 मार्चला प्रदर्शित होणार आहे. पण आजपासूनच या चित्रपटाचे प्रीव्यू शोज सुरु झाले आहेत. या चित्रपटाबद्दल एक प्रचंड उत्सुक्ता आहे. हा चित्रपट प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसातच 100 कोटीचा टप्पा पार करेल अशी स्थिती आहे. सगळ्याच थिएटरमध्ये या चित्रपटासाठी जोरदार Advance बुकिंग सुरु आहे. चित्रपटाच्या प्रीव्यू शो ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. रेहमान डकैतनंतर आता त्याची ल्यारी आणि हमझा मझारी यांचं पुढे काय होणार?. बडे साहब कोण? या प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायला प्रेक्षक उत्सुक आहेत. धुरंधरचा पहिला पार्ट अशा वळणावर संपला की आता दुसऱ्या भागाबद्दल प्रचंड उत्सुक्ता, कुतूहल आहे.

भारत-पाकिस्तान संघर्ष, हेरगिरी, अंडरवर्ल्ड आणि मुख्य म्हणजे चित्रपटाची कथा यामुळे बऱ्याच दिवसानंतर प्रेक्षकांना एक चांगला चित्रपट पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. धुरंधरच्या पहिल्या पार्टने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. दुसरा भाग त्याहीपेक्षा जबरदस्त असेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनापूर्वी आदित्य धरने प्रेक्षकांना एक कळकळीची विनंती केली आहे. “5 डिसेंबर 2025 रोजी धुरंधर सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला. त्यानंतर तुम्ही फक्त हा चित्रपट पाहिला नाही, तर त्यावर प्रेम केलत. तुम्ही हा चित्रपट जगलात. तुम्ही प्रत्येक डिटेलच कौतुक केलं. वादविवाद केलेत. पुन्हा पाहिलात. अशा गोष्टी नोटिस केल्यात ज्याचा मी विचारही केला नव्हता” असं आदित्य धरने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

प्रेक्षकांना त्यांचा अनुभव घेऊ द्या

“मी सर्वांना अत्यंत मनापासून विनंती करतो की, कृपया स्पॉइलर्स शेअर करू नका” अशी आदित्य धरने विनंती केली आहे. स्पॉइलर्स म्हणजे कथा सांगून मजा घालवू नका. प्रेक्षकांना त्यांचा अनुभव घेऊ द्या. ‘धुरंधर : द रिव्हेंज’ चे काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होण्याचीही शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य धरने ही विनंती केली आहे. धुरंधरच्या चाहत्यांनी सुद्धा ही पोस्ट रिशेअर करत आपला पाठिंबा दिला आहे. “जे कोणी आज ‘धुरंधर : द रिव्हेंज’ पहायला जाणार आहेत, त्यांनी स्पॉइलर्स शेअर करणं टाळा. चाहत्यांचा चित्रपट पाहण्याचा आनंद, मजा घालवू नका” असं एका युजरने म्हटलं आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0