दुःखात वेडी झाली अभिनेत्री, BF परत मिळवण्यासाठी गेली भोंदूबाबाच्या आहारी, नेमकं काय घडलं?

Mar 25, 2026 - 20:32
Mar 25, 2026 - 20:32
 0  7
दुःखात वेडी झाली अभिनेत्री, BF परत मिळवण्यासाठी गेली भोंदूबाबाच्या आहारी, नेमकं काय घडलं?

एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये किस्सा सांगितला आहे. तिने बॉयफ्रेंडला आयुष्यात परत आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. शेवटी ती भोंदूबाबाच्या देखील आहारी गेल्याचे तिने स्वत: सांगितले आहे.

सध्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहेत. या भोंदूबाबाने त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगत अनेक महिलांवार लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केले. हे प्रकरण चर्चेत असताना एक प्रसिद्ध अभिनेत्री चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी भोंदूबाबाच्या दरबारी गेली होती. आता ही अभिनेत्री कोण आहे? तिच्यासोबत काय घडलं होतं? जाणून घ्या...

हिंदी टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक आणि भावनिक प्रवास समोर आला आहे. प्रेमभंगाच्या दुःखात ती इतकी खोलवर बुडाली होती की, तिने आपल्या प्रियकराला परत मिळवण्यासाठी अंधश्रद्धेचा मार्गही स्वीकारला होता.

दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक अत्यंत गाजलेली जोडी होती. ‘बनूं मैं तेरी दुल्हन’ या मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली. ऑनस्क्रीन जोडी इतकी लोकप्रिय झाली की, लवकरच त्यांची मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. तब्बल ८ वर्षे त्यांचे रिलेशनशिप चांगले चालले होते. चाहते त्यांना लग्न करताना पाहण्याची आतुरतेने वाट पाहत होते.

मात्र अचानक दोघांचे नाते तुटले. ब्रेकअपनंतर दिव्यांकाचे जग पूर्णपणे कोलमडले होते. तिने एका मुलाखतीत मोकळेपणाने सांगितले, “मी प्रेमात इतकी वेडी झाले होते की, शरदला परत मिळवण्यासाठी मी सर्व सीमा ओलांडल्या. मला वाटायचे की, त्याच्यावर कोणीतरी काळा जादू केली आहे. त्याला वाचवण्यासाठी आणि माझ्याकडे परत आणण्यासाठी मी भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेच्या मार्गानेही जायला तयार होते.”

या मानसिक तणावामुळे तिच्या कामावरही वाईट परिणाम झाला. ती शूटिंग दरम्यान वारंवार ढसाढसा रडायची. अखेर तिला जाणीव झाली की, एखाद्याचे प्रेम मिळवण्यासाठी इतकी धडपड करावी लागत असेल, तर ते खरे प्रेम असू शकत नाही.

नंतर ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेच्या सेटवर दिव्यांकाची भेट विवेक दहियाशी झाली. विवेक त्या मालिकेत सहाय्यक भूमिकेत होता, तर दिव्यांका मुख्य अभिनेत्री होती. सेटवर सुरू झालेली मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. २०१६ मध्ये दोघांनी थाटामाटात लग्न केले आणि एक सुखी संसार सुरू झाला.

आता या जोडप्याच्या आयुष्यात आनंदाची नवी बातमी आली आहे. लग्न झाल्यानंतर १० वर्षांनी दिव्यांका त्रिपाठी ४१ व्या वर्षी आई होणार आहेत. नुकताच दिव्यांकाने आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली असून, तिच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0