‘धुरंधर’ पाहिल्यानंतर भैसटला पाकिस्तान, जे इतके दिवस बोलत होता, तेच करुन दाखवलं

Apr 14, 2026 - 15:17
 0  3
‘धुरंधर’ पाहिल्यानंतर भैसटला पाकिस्तान, जे इतके दिवस बोलत होता, तेच करुन दाखवलं

'धुरंधर' सिनेमाने फक्त भारतातच नाही तर, संपूर्ण जगात विक्रम रचले आहेत. पण आदित्य धर सिनेमा पाहिल्यानंतर पाकिस्तान भैसटला आहे. एवढंच नाही तर, पाकिस्तान जे इतके दिवस बोलत होता, तेच करुन दाखवलं

अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शिक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमाने गेल्या वर्षी 5 डिसेंबर रोजी खळबळ उडवली.. सिनेमाने काही आठवड्यातच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. सिनेमाने सर्व हीट सिनेमांना मागे टाकलं. त्यानंतर काही महिन्यात ‘धुरंधर द रिवेंज’ सिनेमाने तर सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले. सर्वात जलद 100 कोटींचा टप्पा गठणारा ‘धुरंधर 2’ सिनेमा आजही बॉक्स ऑफिसव मोठी कमाई करताना दिसत आहे. ‘धुरंधर’ सिनेमाच्या दोन्ही भागांनी फक्त भारतातच नाही तर, जगभरात मोठी कमाई केली… परदेशातील चाहत्यांनी देखील सिनेमाला डोक्यावर घेतलं. सिनेमात रणवीर सिंग याच्यासोबत सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना दमदार भूमिका साकारली.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिनेमाची जेवढी चर्चा भारतात झाली. त्यापेक्षा जास्त गोंधळ पाकिस्तानात उडाला… शेजारील राष्ट्राने सिनेमाला बॅन केलं. पण जेव्हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला, तेव्हा पाकिस्तान प्रेक्षकांनी सिनेमा दमदार असल्याचं सांगत, प्रचंड कौतुक केलं. एवढच नाही तर, पाकिस्तानी प्रेक्षक दिग्दर्शक आदित्य धर याचे मोठे चाहते झाले.

‘धुरंधर’ सिनेमाची संपूर्ण कथा ल्यारी भोवती फरताना दिसत आहे. सिनेमात, रणवीर सिंगने साकारलेला हमजा ल्यारीवर ताबा मिळवतो. ‘धुरंधर: द रिव्हेंज’ नावाच्या दुसऱ्या भागात, आदित्य धर दाखवतो की, हेर हमजाची भूमिका साकारतो आणि ल्यारीवर स्वतःचं राज्य आणतो 

पाकिस्तानी प्रेक्षकांनी ‘धुरंधर’ सिनेमाला प्रोपेगेंडा सिनेमा म्हणून पाहिलं नाही. एक मनोरंजन म्हणून त्यांनी सिनेमाचा आनंद घेतला. मात्र, ल्यारी बॉम्बस्फोटाचे पडसाद पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात उमटले. आता ‘धुरंधर’ सिनेमाला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने ‘हमारी ल्यारी’ या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ल्यारीबद्दलचं सत्य मांडण्याचा निर्मात्यांचा दावा आहे. पाकिस्तानी निर्मात्यांचं असं म्हणणं आहे की, ‘धुरंधर’ सिनेमात ल्याची नकारात्मक बाजू मांडली आहे. आता ‘मेरी ल्यारी’ सिनेमातून ते चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.

एका रिपोर्टनुसार, ‘मेरा ल्यारी’ हा सिनेमा आयेशा ओमरने निर्मित आणि कार्यकारी निर्माता म्हणून तयार केला आहे. आयेशा ओमरने इंस्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. “‘मेरा लयारी’ आता जगाला भेटायला तयार आहे.” सिनेमाचं प्रीमियर 8 मे 2026 रोजी लंडनमधील ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या 28 व्या यूके एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. .

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0