मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…

Mar 18, 2026 - 20:30
 0  5
मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…

Russia on War : इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात अली लारीजानी यांचे निधन झाले आहे. यावर रशियाने आक्रमक प्रतिक्रिया दिली असून इस्रायल आणि अमेरिकेवर गंभीर आरोप करत टीका केली आहे.

इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात अली खामेनी यांचे सल्लागार अली लारीजानी यांचे निधन झाले आहे. यावर रशियाने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. रशियाने लारीजानी यांच्या मृत्यूला अमेरिका आणि इस्रायलने केलेली हत्या असे म्हटले आहे. रशियाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘इराणसारख्या सार्वभौम राष्ट्रासोबत अशा बेकायदेशीर कृती स्वीकारार्ह नाहीत. इराणच्या नेत्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवणे, त्यांची हत्या करणे किंवा त्यांना पूर्णपणे संपवण्याचा कोणताही प्रयत्नाचा आम्ही निषेध करतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात रशियाने सावध भूमिका घेतली आहे. रशियाच्या मते, हे हल्ले पूर्वनियोजित असून कोणत्याही उकसाव्याशिवाय केलेले सशस्त्र आक्रमण आहेत. रशियाने याला एका सार्वभौम राष्ट्रावरचा हल्ला मानले असून, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. तसेच याला ‘रिजीम चेंज’ करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरण्यात आले आहे.

चर्चेतून मुद्दा सोडवण्याचे रशियाकडून आवाहन

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरातील व्यापारावर परिणाम झाला आहे. रशियाने वारंवार इस्रायल आणि अमेरिकेला हल्ले थांबवून चर्चेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झखारोवा यांनी सांगितले की, रशिया मध्य पूर्वेत तणाव कमी करण्यासाठी पावले उचलेल आणि शांततामय तोडग्यावर भर देत आहे. मात्र अद्याप इराण आणि इस्रायल किंवा अमेरिका यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही.

पुतीन यांच्याकडून मध्यस्थीचा प्रयत्न

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अली खामेनी यांच्या हत्येला ‘निंदनीय हत्या’ असे म्हटले होते. तसेच नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या नियुक्तीचे स्वागत करत इराणला समर्थन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पुतीन यांनी आखाती देशांच्या नेत्यांशी फोनवर चर्चा करून मध्यस्थीची भूमिकाही बजावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अद्याप त्यांना यश मिळालेले नाही. अशातच आता त्यांनी लारीजानी यांच्या हत्येवरून इस्रायल आणि अमेरिकेवर सडकून टीका केली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0