Priyanka Chopra : ‘बॉलिवूड सोडायचं नव्हतं, मला जबरदस्ती ..’, प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा …

Feb 21, 2026 - 16:15
 0  0
Priyanka Chopra : ‘बॉलिवूड सोडायचं नव्हतं, मला जबरदस्ती ..’, प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा …

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट "द ब्लफ" चे प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीदरम्यान, तिने बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा केला.

प्रियांका चोप्रा ही अशा काही अशा स्टार्सपैकी आहे जिने फक्त बॉलिवूडमध्ये नव्हे तर हॉलिवूडमध्येही खास ओळख निर्माण केली असून आजच्या घडीला तो ग्लोबल आयकॉन आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत, तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना, हॉलिवूडमध्ये संधी शोधण्यासाठी प्रियांका अमेरिकेत गेली आणि तिथेच तिने पुन्हा एकदा तिची कारकीर्द सुरू केली. मात्र बॉलिवूड टू हॉलिवूड याच प्रवासाबद्दल तिने एक धक्कादायक खुलासा केला. मला कधीच बॉलिवूड सोडायचं नव्हतं, पण मला जबरसदस्तीने बाहेर संधी शोधण्यासाठी ढकलण्यात आलं, असा गौप्यस्फोट प्रियांकाने केला.

बॉलिवूड टू हॉलीवूड कसा झाला प्रियांकाचा प्रवास ?

खरं तर, फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतच्या तिच्या प्रवासाबद्दल प्रियांका मोकळेपणाने बोलली “मला वाटत नाही की मला कधीच बॉलिवूड सोडायचे होते. मी जेव्हा हिंदी चित्रपटांत काम करत होते, तेव्हा अनेक कारणांना मला वाटलं की हे मर्यादित आहे. मला पुढे जायचं होतं, प्रगति करायची होती. एक कलाकार म्हणून रोमांचक असलेल्या संधी शोधण्यासाठी माझ्यावर दबाव होता. मी अमेरिकेत काम करायला सुरुवात केली आणि आता, जवळजवळ 12 वर्षांनंतर मला वाटतं की मला खरोखरच अद्भुत काम निवडण्याची गती मिळत आहे, आणि हे सोपं नाही” असं प्रियांकाने नमूद केलं.

दोन्ही इंडस्ट्रीत काम करण्याची मजा

“मला आपले भारतीय चित्रपट खूप आवडतात. मी वाराणसी या चित्रपटाद्वारे, भारतात परत येत असल्यामुळे खूप आनंदी आहे आणि मला दोघांपैकी एक निवडण्याची गरज पडणार नाही. मी कधीच निवड केली नाही. मला असं वाटतं की मी दोन्ही जगांमध्ये आहे आणि मला दोन्ही उद्योगांमध्ये काम करायला आवडते.” असंही प्रियांकाने सांगितलं. “दोन्ही ठिकाणी काम करणं अनेक प्रकारे वेगळं आहे, वेगळी संस्कृती आहे, पण आता माझा मेंदू दोन वेगवेगळ्या प्रकारे काम करू शकतो, त्यामुळे ही खरोखर एक अनोखी, आश्चर्यकारक, मजेदार गोष्ट आहे” असा अनुभव प्रियांकाने सांगितला.

हॉलिवूडमध्ये प्रियांकाचा प्रवास

2012 साली जेव्हा प्रियांकाने तिच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा तिने हॉलिवूडमध्ये संधी शोधायला सुरुवात केली. तिने पश्चिमेकडील देशांमध्ये क्वांटिको या टेलिव्हिजन शोमध्ये मुख्य भूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने बेवॉच आणि द मॅट्रिक्स रिझरेक्शन्स सारख्या प्रमुख चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. आता, प्रियांका कार्ल अर्बनसोबत सिटाडेल, हेड्स ऑफ स्टेट आणि द ब्लफ सारख्या तिच्या आगामी चित्रपटातून, मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम करत आहे.

तिच्या पुढच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती फ्रँक ई फ्लॉवर्सच्या द ब्लफमध्ये दिसेल. हा एक पायरेटड ॲडव्हेंचर फिल्म आहे, त्यामध्ये अनेक महत्वाचे कलाकार आहेत. 25 फेब्रुवारीला अमेझॉन प्राइम व्हिडीओ वर रिलीज होणार आहे. प्रियांकाच्या हातात, एस. एस. राजामौली यांचा वाराणसी हा चित्रपटही आहे, त्याद्वारे 8 वर्षांनी ती भारतीय सिनेमांत पुनरागमन करत आहे. या चित्रपटात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन देखील आहेत आणि हा चित्रपट एप्रिल 2027 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0