IND vs PAK : वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, सामन्याचं ठिकाणही निश्चित, जाणून घ्या

Mar 18, 2026 - 20:36
 0  6
IND vs PAK : वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, सामन्याचं ठिकाणही निश्चित, जाणून घ्या

India vs Pakistan : क्रीडा रसिकांना कायम भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रतिक्षा असचे. चाहत्यांना आशिया कप आणि टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेनिमित्ताने या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांत क्रिकेट सामना पाहायला मिळाला. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात नियोजित वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.

खेळ कोणताही असो क्रीडाप्रेमींना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रतिक्षा असते. टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आता एका वर्ल्ड कप स्पर्धेत हे 2 चिवट कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध भिडणार आहेl. मात्र हा सामना क्रिकेटचा नाहीय. हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेनिमित्ताने हे 2 संघ आमनेसामने असणार आहेत. या हॉकी वर्ल्ड कप आणि भारत-पाकिस्तान सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

एफआयएच हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये रंगणार आहे. स्पर्धेला 15 ऑगस्टला सुरुवात होणार आहे. तर 30 ऑगस्टला सांगता होईल. या स्पर्धेसाठी गटनिहाय संघांची विभागणी करण्यात आली आहे. मेन्स आणि वुमन्स टीमला 4-4 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार प्रत्येक गटात 4 संघांचा समावेश आहे.

भारत-पाकिस्तान एकाच गटात

हॉकी वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांना क्रिकेटप्रमाणे एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानसह या डी ग्रुपमध्ये इंग्लड एन्ड वेल्सचा समावेश आहे. डी ग्रुपमधील सर्व संघांच्या सामन्याचं आयोजन हे नेदरलँड्समध्ये करण्यात आलं आहे.

टीम इंडियासमोर पाकिस्तानचं आव्हान

हॉकी टीम इंडियासाठी हा सामना फार चढाओढीचा असणार आहे. टीम इंडियासमोर पाकिस्तानचं आव्हान असल्याने या सामन्यात कस लागू शकतो. दोन्ही संघ याआधी 2024 साली आशियाई चॅम्पिन्स ट्रॉफी स्पर्धेत आमनेसामने आले होते.

महिला संघासोबत डी ग्रुपमध्ये कोण?

वुमन्स हॉकी टीमचा डी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. या डी ग्रुपमध्ये चीन,दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा समावेश आहे. वुमन्स हॉकी टीम इंडियाचे सामनेही नेदरलँड्समध्ये होणार आहेत.

वुमन्स टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान

दरम्यान वुमन्स टीम इंडियासाठी इंग्लंड विरुद्धचा सामना हा आव्हानात्मक असणार आहे. दोन्ही संघ तोडीसतोड आहेत. त्यामुळे इंग्लंडसमोरही भारताचं कडवट आव्हान असणार आहे.

कोणते संघ कोणत्या गटात?

ए ग्रुप : नेदरलँड्स, अर्जेंटीना, न्यूझीलंड आणि जपान

बी ग्रुप: बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि मलेशिया

सी ग्रुप : ऑस्ट्रेलिया, स्पेन, आयर्लंड आणि दक्षिण अफ्रीका

डी ग्रुप : इंग्लंड, भारत, पाकिस्तान आणि वेल्स

वुमन्स टीमची अशी विभागणी

ए ग्रुप : नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, चिली आणि जपान.

बी ग्रुप: अर्जेंटीना, जर्मनी, अमेरिका आणि स्कॉटलंड.

सी ग्रुप : बेल्झियम, स्पेन, न्यूझीलंड आणि आयर्लंड.

डी ग्रुप : चीन, इंग्लंड, भारत आणि साउथ अफ्रिका.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0