Suryakumar Yadav : वर्ल्ड कप विजयासह सूर्या भाऊचा जलवा, हिटमॅन रोहितला दे धक्का, मोठा रेकॉर्ड ब्रेक
Suryakumar Yadav T20Is Captaincy Record: सूर्यकुमार यादव याने कर्णधार म्हणून पहिल्याच झटक्यात टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. सूर्याच्या नेतृत्वातील टीम इंडियाचा हा 42 वा टी 20i विजय ठरला. सूर्याने यासह रोहितचा महारेकॉर्ड मोडीत काढला.
टीम इंडियाने 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करुन आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या ट्रॉफीवर मोहोर उमटवली. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडवर 96 धावांनी मात केली.
टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. तसेच इंडिया यासह सर्वाधिक 3 वेळा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणारी पहिलीच टीम ठरली.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने यासह इतिहास घडवला. सूर्या रोहित शर्मा याला मागे टाकत जगात भारी ठरला. सूर्याने नंबर 1 कर्णधार होण्याचा बहुमान मिळवला.
सूर्यकुमार यादव टी 20i क्रिकेटमध्ये (Full Member Team) सर्वाधिक विजयी टक्केवारी असणारा कर्णधार ठरला आहे. सूर्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 52 पैकी 42 सामने जिंकले आहेत. तर फक्त 8 सामन्यांतच भारताला पराभूत व्हावं लागलं. तर 2 सामन्याचा निकाल लागला नाही.
सूर्याची कर्णधार म्हणून 42 व्या टी 20i विजयासह विजयी टक्केवारी ही 80.77 अशी झाली आहे. सूर्याने यासह रोहितला मागे टाकलं. रोहितची कर्णधार म्हणून विजयी टक्केवारी ही 80.65 इतकी होती.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0