Gautami Patil: गौतमी पाटीलने केलं लग्न? थेट फोटो अपलोड केल्याने सगळेच अचंबित; नवरा…

Mar 22, 2026 - 22:50
 0  5
Gautami Patil: गौतमी पाटीलने केलं लग्न? थेट फोटो अपलोड केल्याने सगळेच अचंबित; नवरा…

गौतमी पाटीलच्या काही फोटोंची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. तिने शिव ठाकरेसोबत लग्न केले आहे, असे म्हटले जात आहे. तिच्या या फोटोंना हजारो लोकांनी लाईक केले आहे. हे फोटो व्हायरल झाले आहेत

नृत्यांगना गौतमी पाटीलची आज वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तिला आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तिची एक झलक पाहण्यासाठी लाखो तरूण जीवाचं रान करतात. तिच्या कर्यक्रमांनाही हजारो तरुणांची गर्दी असते.

दरम्यान, गौतमी पाटील सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर काही फोटो शेअर केले आहेत. गौतमी पाटील चक्क नवरीच्या वेशात दिसत आहे. तिच्यासोबत बिग बॉस विजेता शिव ठाकरे हादेखील दिसत आहे.

हे फोटो पाहून गौतमी पाटील आणि शिव ठाकरे या दोघांनी लग्न केलं की काय? असं उत्सुकतेने विचारले जात आहे. विशेष म्हणजे गौतमीने अपलोड केलेल्या या फोटोंना हजारो लोकांनी लाईक केले असून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

एका फोटोमध्ये गौतमी पाटीलने शीव ठाकरेचा हात पकडल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत शिव ठाकरेने गौतमी पाटीलला आपल्या पत्नीप्रमाणे उचलून घेतले आहे. त्यामुळेच या दोघांनी लग्न केलेल की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

परंतु गौतमी आणि शिव ठाकरे यांचे लग्न झालेले नाही. या दोघांचे 'मासोळी सोन्यावाणी' नावाचे गाणे रिलीज झाले आहे. याच गाण्याच्या शूटिंगदरम्यान हे फोटो काढण्यात आले आहेत. तेच फोटो गौतमी पाटीलने शेअर केले आहेत. गौतमीचे हे नवे गाणे यूट्यूबवर उपलब्ध आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0