जान्हवी कपूर हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन, आकस्मिक मृत्यूमुळे बॉलीवूडवर दुःखाचा डोंगर

Mar 17, 2026 - 15:11
 0  4
जान्हवी कपूर हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन, आकस्मिक मृत्यूमुळे बॉलीवूडवर दुःखाचा डोंगर

बॉलिवूड सेलिब्रिटींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... कारण एका खास व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला आहे, त्यांच्या निधनानंतर जान्हवी कपूर, नोरा फतेही, वरुण धवन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे.

बॉलिवूडमधून अशी एक दुःखद बातमी समोर आली आहे, ज्यामुळे अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई येथील हाय – प्रोफाईल सेलिब्रिटी हेयरस्टाइलिस्ट आणि मेकअप आर्टीस्ट मार्से पेड्रोजो (Marce Pedrozo) याचं निधन झालं आहे… मार्से पेड्रोजो याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यामातून दुःख व्यक्त करत जवळच्या मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे… सेलिब्रिटींनी मार्से पेड्रोजो याचे फोटो पोस्ट करत त्याच्यासोबत असलेल्या आठवणी शेअर केल्या आहेत…

आम्ही दोघे एकमेकांच्या टीमचा भाग होतो – जान्हवी कपूर

मार्से पेड्रोजो यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत जान्हवी म्हणाली, ‘आय लव्ह मार्से… ज्याप्रकारे मी माझ्या वॅनिटीमध्ये प्रवेश करायचे आणि आपण एकमेकांना पाहून मोठ्याने किंचाळायचो आणि म्हणायचो आपल्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत… ती अशक्य वाटणारी कामं, कामाचे वेडेवाकडे तास, तो सगळा गोंधळ, हे सगळंच खूप छान होतं. त्या सगळ्या गोंधळातही, जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र काम करायचो, तेव्हा मला विश्वासाची आणि आनंदाची भावना जाणवायची. तू माझ्या टीमचा फक्त एक भाग नव्हतास तर, आम्ही दोघे एकमेकांची टीम होतो…’ असं म्हणत जान्हवी हिने दुःख व्यक्त केले.

पहिल्या दिवसापासून माझ्या प्रवासाचा भाग – नोरा फतेही

नोरा फतेही दुःख व्यक्त करत म्हणाली, ‘आज मी माझा सर्वात जवळचा मित्र आणि भावाला गमावलं आहे… अशी कोणतीच व्यक्ती नाही, जी माझ्या प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या सोबत होती… मार्से माझ्या पर्सनॅलिटीची सर्वात बेस्ट बाजू समोर आणायचा… जेव्हा जेव्हा लोकांनी आम्हाला पाहिलं, आम्ही कायम हसत खेळत असायचो…’ असं म्हणत नोरा हिने दुःख व्यक्त केलं..

अभिनेता वरुण धवन याने देखील दुःख व्यक्त केलं आहे. ‘रेस्ट इन पीस भाई… विश्वास बसत नाही… असं वाटत आहे काही दिवसांपूर्वी आपण एकमेकांसोबत शुटींग करत होतो… तो खूप प्रेमळ आणि चांगला व्यक्ती होता.’ असं वरुण म्हणाला. या कलाकारांव्यतिरिक्त, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने देखील 15 मार्च 2026 रोजी निधन झालेल्या मार्से पेड्रोजो याला श्रद्धांजली वाहिली. सध्या मार्से पेड्रोजो याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0