कॉपी बहाद्दरांकडून चक्क 'एआय'ला गंडवण्याचा प्रयत्न, महिनाभरात फेर परीक्षा घेण्याचे आदेश - MAHARASTRA GOVERNMENT

Aug 3, 2025 - 14:16
 0  1

मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर मात करण्याच्या नादात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या तब्बल 2,152 विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपीचा मार्ग अवलंबला, मात्र 'एआय' आधारित प्रॉक्टरिंग तंत्रज्ञानामुळे त्यांचा हा डाव उघडकीस आला. ही धक्कादायक घटना जुलै 2025 सत्रातील परीक्षेदरम्यान समोर आली आहे.

यंदा प्रथमच 'एआय प्रॉक्टोर्ड' तंत्रज्ञान वापरून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या, ज्यामध्ये 36,201 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 7 जुलै 2025 रोजी परीक्षा पार पडली आणि अवघ्या 10 दिवसांत, 17 जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, तंत्रज्ञानाच्या मदतीने 2 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नियमभंग केल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे त्यांच्या निकालांवर तात्पुरती रोक लागली आहे.

याआधीच्या पारंपरिक परीक्षांमध्ये निकाल जाहीर होण्यासाठी दोन महिने लागत होते. विद्यार्थ्यांचा वेळ वाचवण्यासाठी यंदा एआय प्रॉक्टोरिंगचा निर्णय घेण्यात आला होता. परीक्षा घेण्यापूर्वी सराव चाचणीद्वारे सर्वांना नव्या प्रणालीची माहितीही देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आता 23 ऑगस्ट 2025 रोजी फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. निकाल राखून ठेवलेले आणि अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतील. याबाबतची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0