बाबा रामदेव यांच्या पतंजलीची कमाल, एक वर्षांत गुंतवणूकदार झाले मालामाल
एक वर्षापूर्वी,पतंजली फूड्सचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी १३०० रुपयांवर पोहोचले होते, पतंजली फूड्सच्या शेअरचे भाव सध्या १७०० रुपयांच्याजवळ पोहोचले असून या तेजीमागे पतंजली फूड्सवरील गुंतवणूकदारांचा विश्वास दिसत आहे.

बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सचे शेअर्सनी गेल्या एक वर्षात मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. बीएसईच्या आकडेवारीनुसार या कंपनीचे शेअर्समध्ये सुमारे २९ टक्के वाढ पाहायला मिळत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इतकी मोठी वाढ पाहायला मिळालेली नाही. गेल्या सुमारे एक वर्षांपूर्वी कंपनीचे शेअर १३०० रुपयांसह ५२ आठवड्यांच्या लोअर लेव्हलला पोहचला होता. जे सध्याच्या काळात सुमारे १७०० रुपयांवर पोहचले होते. चला तर पाहूयात अखेर गेल्या एक वर्षात शेअर बाजारात पतंजलीच्या शेअरमध्ये कसे बदल पाहायला मिळाले ते पाहूयात…
एक वर्षातील कामगिरी
गेल्या एक वर्षात पंतजलीच्या शेअरमध्ये सुमारे २९ टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली होती. वास्तविक २४ जून २०२४ रोजी पतंजलीच्या शेअरमध्ये १,३०२.२ रुपयांसह ५२ आठवड्यानंतर लोअर लेव्हलला पोहचला होता. तेव्हापासून या कंपनीत शेअरमध्ये ३७३.३ रुपयांचा वाढ पाहायला मिळाली आहे. आकड्यांना पाहाता बीएसईवर कंपनीचा शेअर ११ जून रोजी १,६७५.५० रुपयांवर बंद झाला आहे. याचा अर्थ कंपनीचे शेअरनी गुंतवणूकदारांना गेल्या एक वर्षांत सुमारे २८९ टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली आहे.
गुंतवणूकदारांना चांगला वेळ मिळत आहे
शेअर बाजारात पतंजलीच्या शेअर्सच्या वाढीमुळे, कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना खूप फायदा झाला आहे. जर एखाद्याने एका वर्षापूर्वी कंपनीच्या १,३०२.२ रुपये किमतीच्या शेअर्समध्ये सुमारे १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्या वेळी गुंतवणूकदाराला सुमारे ७७ शेअर्स मिळाले असते. ज्यांचे मूल्य सध्या १.२९ लाख रुपये झाले असते. याचा अर्थ असा की एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना सुमारे २९ हजार रुपयांचा नफा मिळाला असता.
कंपनीच्या व्हॅल्यूएशनमध्ये वाढ
पतंजली कंपनीच्या व्हॅल्यूएशनमध्ये बरीच वाढ झाली आहे. जर आकडेवारी पाहिली तर, गेल्यावर्षी जेव्हा कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता, तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप ४७,२०५.५६ कोटी रुपयांपर्यंत घसरले होते. त्यानंतर कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये १३,५३२.३७ कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे. सध्या कंपनीची व्हॅल्यूएशन ६०,७३७.९३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
आता आणखी वाढ होण्याची शक्यता
पतंजली कंपनीच्या शेअर्समध्ये आता आणखी वाढ होऊ शकते असा दावा पतंजली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. याचे कारण या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात प्रचंड वाढ झाली होती. मार्च २०२५ मध्ये पतंजली फूड्स लिमिटेडच्या निव्वळ नफ्यात ७४ टक्के वाढ झाली, ज्यामुळे कंपनीचा नफा ३५८.५३ कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा २०६.३१ कोटी रुपये होता. कंपनीने नियामक फायलिंगमध्ये माहिती दिली होती की गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एकूण उत्पन्न ९,७४४.७३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्यावर्षी याच कालावधीत ८,३४८.०२ कोटी रुपये होते.
What's Your Reaction?






