इकते हतबल मुख्यमंत्री कधी पाहिले नाही, मुख्यमंत्र्यांची नितीमुल्य समिती गेली कुठं: उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल - UDDHAV THACKERAY ATTACK ON CM

Aug 3, 2025 - 14:40
 0  0
इकते हतबल मुख्यमंत्री कधी पाहिले नाही, मुख्यमंत्र्यांची नितीमुल्य समिती गेली कुठं: उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल - UDDHAV THACKERAY ATTACK ON CM

मुंबई : "जगाचा पोशिंदा बळीराजाचा अवमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता खातं बदललं. रमी खेळणाऱ्यांना क्रीडा मंत्री केलं, म्हणजे रमीला ऑलिंपिकचा दर्जा मिळणार. आम्ही सत्तेत असताना आरोप करत राजीनाम्याची मागणी करायचे आणि आता खातं बदल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितिमुल्य समिती स्थापन केली होती, ती गेली कुठं," असा सवाल उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला. महायुती सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत असून राज्यभरात आंदोलन करत भ्रष्टाचारामुळे उघड झालेला विद्रुप चेहरा जनतेसमोर आणणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुतीला दिला.

आज शेतकरी क्रांती संघटनेचं शिवसेनेत विलीनीकरण करण्यात आलं. यावेळी संघटनेचे संस्थापक भाऊ बिलेवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांप्रती किती गंभीर ? : "2019 मध्ये मविआचं सरकार सत्तेत आल्यानंतर मी अनपेक्षित मुख्यमंत्री झालो. नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे पहिलंच होतं. त्यावेळी राज्यातील शेतकरी कर्जमाफी करा, या मागणीसाठी माझ्याकडं आले नाही. परंतु शेतकऱ्याप्रती आदर आणि त्यांच्या भावना लक्षात घेता शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. मात्र आता खातं बदल झालेले माजी कृषिमंत्री तर शेतकऱ्यांवरच टीका करत होते. शेतकऱ्यांप्रती बेताल वक्तव्य केली. पावसाळी अधिवेशनात सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ वायरल झाला. मला वाटलं मुख्यमंत्री संवेदनशील असून त्यांचा राजीनामा घेतील. उलट देवेंद्र फडणवीस यांनी खातं बदलत कोकाटे यांचं मंत्रिपद वाचवलं. यावरुन देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांप्रती किती गंभीर हे स्पष्ट होते," असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना काढला.

गद्दार पैशांसाठी विकले : "सगळीच माणसं पैशांसाठी विकली जात नाहीत, पण गद्दार पैशांसाठी विकली जातात. निष्ठावंत विकली जात नाही, काही जणांना मोठं केलं ती गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती निष्ठावंत आजही शिवसेनेबरोबर आहेत," असंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील निकाल अनाकलनीय आहे. कोणालाच वाटलं नव्हतं असा निकाल येईल. आता यांचे घोटाळे बाहेर पडतातय. लाडक्या बहिणीत किती बापे घुसले, कोणी घुसवले, पैसे कुठं गेले याचा हिशेब महायुती सरकारला द्यावाच लागेल. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष वरचढ ठरला. संसदेतही विरोधी पक्षाने भाजपा सरकारला सळो की सळो करुन सोडलं," असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला.

शेतकरी क्रांती संघटनेचं विलीनीकरण : शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचं विलीनीकरण शनिवारी उबाठा पक्षात झालं. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांच्यासह राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी उबाठात प्रवेश केला. यावेळी खासदार अरविंद सावंत, प्रवक्त्या जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. बुलढाणा, अमरावतीतील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश वणी विधानसभेतील भाजपाचे यवतमाळ माजी जिल्हा परिषद सदस्य बंडु चांदेकर, माजी जिल्हापरिषद सदस्य संघदिप भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलिप काकडे यांनी शनिवारी मातोश्री निवासस्थानी त्यांच्या सहकाऱ्यांसह उबाठा पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0